‘रयत’स्थापना पर्वासह स्वातंत्र्यलढ्याचे शब्दधन अप्रकाशित
‘रयत’स्थापना पर्वासह स्वातंत्र्यलढ्याचे शब्दधन अप्रकाशित 
पश्चिम महाराष्ट्र

‘रयत’स्थापना पर्वासह स्वातंत्र्यलढ्याचे शब्दधन अप्रकाशित

जयसिंग कुंभार,

सांगली : महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या इतिहासासह तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकू शकतील, असे शब्दधन दुधगावच्या देशभक्त भाऊसाहेब कुदळे यांच्या रोजनिशींमध्ये सामावले आहे. त्यांच्या १९०६ ते १९२५ पर्यंतच्या या रोजनिशी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊसाहेब कुदळे यांच्या समाजकार्याचा इतिहासच आहे. हे शब्दधन मोडी आणि मराठीत असून ते प्रकाशात आणण्याची गरज आहे.

कर्मवीर भाऊराव यांचे कुंभोज गाव आणि कुदळे यांचे दुधगाव यातील भौगोलिक अंतर दोन-तीन किलोमीटरचेच. मात्र, या दोघांनी समाज परिवर्तनाचा घेतलेला ध्यास त्यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांतून येतो. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ मध्ये काले येथे केली. त्यानंतर त्यांनी सातारामध्ये शिवाजी बोर्डिंग सुरू केले. मात्र, या सर्व शैक्षणिक कार्याचा प्रारंभ त्याआधी दहा वर्षे दुधगाव शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून झाला. जणू हे ‘रयत’चे आद्य मॉडेलच होते. भाऊसाहेबांनी १९०९ मध्ये कर्मवीरांसह, नाना रावजी येडेकर, शामगोंडा पाटील आदींच्या सहभागाने दुधगाव आश्रम सुरू केला. पंचक्रोशीतील सुमारे ४७ विद्यार्थी तेव्हा दुधगावमधील चतुरभाई शहा यांच्या वाड्यात सुरू केलेल्या वसतिगृहात राहायला होते. ही मुले एकत्र रहायची, अभ्यास करीत, व्यायाम करीत, एकत्र झोपत. म्हणून या वसतिगृहाला ड्राय बोर्डिंग म्हणत. समाजाच्या सहभागातून सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र शिकवण्याचे हे आद्य रयत मॉडेल होते.

व्यापारी वर्गातील संस्थाचालकांनी देशभावनेने प्रेरित होऊन ही संस्था सुरू केली. या वसतिगृहाच्या रूपाने सोवळेओवळे पाळणाऱ्या दुधगावमध्ये अस्पृश्‍यता निवारणाची जणू सुरवात झाली. पुढे कर्मवीरांनी रयत सुरू केल्यानंतर दुधगाव शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालकांनी कर्मवीरांना हीच संस्था तुम्ही चालवा, अशी विनंती केली. त्यानंतर ही संस्था रयतमध्ये विलीन झाली. पुढे भाऊराव कुदळे यांनी सातारा स्कूल बोर्डाचे १९२८ ते ३१ या काळात चेअरमन होते. त्यांची महात्मा गांधीच्या विचारांचे अनुयायी असलेल्या भाऊरावांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने रयतची धुरा वाहिली. त्यांनी प्रांतिक निवडणुका लढवल्या. खुद्द यशवंतराव चव्हाण भाऊरावांचे प्रचारक होते. भाऊसाहेब कुदळे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या सर्व शैक्षणिक कार्याचा इतिहास तसा पडद्याआडच राहिला आहे. भाऊरावांच्या या अप्रकाशित डायऱ्या समाजासमोर आल्या, तर रयत परिवाराच्या एकूण वाटचालीच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडू शकतो.

दरवर्षीच्या तीनशे ते साडेतीनशे दिवसांच्या नोंदी, अशा सुमारे चौदा वर्षांच्या या डायऱ्या आहेत. मराठी आणि मोडीत लिपीतील सुमारे साडेचार हजार पानांचे हे लेखन आहे. या डायऱ्यांच्या पानोपानी प्रामुख्याने दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, रयत शिक्षण संस्था, काँग्रेस पक्षाची चळवळ, पश्‍चिम महाराष्ट्रातील ब्रह्मणेतर चळवळ, तत्कालीन संयुक्त सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चळवळींच्या शेकडो नोंदी आहेत. कर्मवीर आणि भाऊसाहेब कुदळे यांच्या इतिहासाचा हा दस्ताऐवज म्हणजे या दोघांच्या पुरोगामी विचाराचे शब्दधनच आहे. ते आम्ही लवकरच समाजापुढे आणणार आहोत.

- अविनाश कुदळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांना मिळणार पक्षात महत्वाची जबाबदारी? विधानसभेच्या तोंडावर महत्वाचं पद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

David Wiese Retires : टी-20 वर्ल्ड कपमधून संघ बाहेर पडताच दिग्गज खेळाडू घेतली निवृत्ती!

कोरोनानंतर आणखी एका गूढ आजाराने डोकेदुखी वाढली! ही लक्षणे दिसली तर ४८ तासात रुग्णाचा मृत्यू निश्चित

Latest Marathi News Live Update : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, 4 जण गंभीर जखमी

IND vs AFG T20 WC Super-8 : कधीपासून रंगणार सुपर-8चा थरार? भारताचा पहिला सामना कोणाशी; जाणून घ्या Details

SCROLL FOR NEXT