Railway
Railway 
पश्चिम महाराष्ट्र

अनारक्षित रेल्वे तिकीट आता ऑनलाइन

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांना आता यूटीएस या मोबाईल ॲपद्वारे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. एक नोव्हेंबर २०१८ पासून ही सुविधा देशभर सुरू करण्यात आली असून, ऐन उन्हाळ्यात तिकिटासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्यापासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. 

स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची भली मोठी रांग आणि रेल्वे सुटण्याची वेळ, अपुऱ्या तिकीट खिडक्‍या अन्‌ कमी मनुष्यबळ, रेल्वे डब्यात जागा मिळते की नाही याची धाकधूक आदींपासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. नेटवर्क डाऊन, प्रवाशांमधील भीती, ॲपबद्दल माहिती नाही, यासह अन्य कारणांमुळे प्रवाशी अजूनही रांगेत उभे राहूनच तिकीट काढतात; परंतु आता रांगेत उभे न राहता रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर परिसरात अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. 

उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या वाढते. त्या पार्श्‍वभूमीवर हे ॲप अद्ययावत करण्यात आल्याने तत्काळ ऑनलाइन तिकीट उपलब्ध होणार आहे.

असे काढता येईल तिकीट
प्रवाशाने ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक, नाव, शहर, गाडीचा प्रकार, तिकीटचा प्रकार याची माहिती भरावी. त्यानंतर रेल्वे वॉलेट ऑप्शनवर अथवा क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे तिकीट बुक करता येईल. ॲपद्वारे तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द करता येणार नाही. ॲडव्हान्स बुकिंगही करता येणार नाही.

ठळक बाबी...
    यूटीएस ॲपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट, मासिक पास, अनारक्षित तिकीट काढण्याची सोय
    ‘प्ले स्टोअर’मधून ॲप डाऊनलोड करून संबंधितांना करावी लागणार नोंदणी
    क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे तिकीट बुकिंगची सोय
    रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटरपर्यंतच राहणार या ॲपची रेंज
    रेल्वे रुळाच्या २५ मीटरच्या परिसरात मिळणार नाही नेटवर्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT