Unusual punishment for molesting girls 
पश्चिम महाराष्ट्र

छेड काढणाऱ्यांना दिली अनोखी शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन सरसावले असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टारगट मुलाला पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी सर्वांसमोर उठाबशा काढायला लावल्या. या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा होती. 

गेल्या काही दिवसांपासून शहरातील शाळा-महाविद्यालये, तसेच बसस्थानक परिसरात दुपारी व सायंकाळी टारगट मुलांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. बसस्थानकात चित्रविचित्र केशभूषा, वेशभूषा केलेल्या युवकांचा वावरही वाढला आहे. शहर व बसस्थानक परिसरात युवकांच्या टोळ्या दिवसभर ठिय्या मांडून असतात.

पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान नेमले

तालुक्‍यातील ग्रामीण भागातून एसटी बसने शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या युवतींची संख्या मोठी आहे. शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर रस्त्यावर, तसेच बसस्थानकात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत काही टारगट मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या निर्ढावलेल्या टारगटांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान नेमले आहेत. 

चित्रीकरण "व्हायरल'

बसस्थानकातील उपाहारगृहाजवळ आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुलींना शेरेबाजी करणाऱ्या एका युवकाला पकडून, बंदोबस्तावरील हेडकॉन्स्टेबल राजू डोंगरे, गृहरक्षक दलाच्या जवान अश्विनी वाळे यांनी सर्वांसमोर उठाबशा काढायला लावून माफी मागण्यास भाग पाडले. या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून अनेकांनी ते समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने या प्रकरणाची चर्चा शहरात रंगली. 

कठोर कारवाई करणार

बसस्थानक, तसेच महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढणारे टारगट, तसेच शहरातील रस्त्यांवरून आरडाओरडा करीत दुचाकीवर चकरा मारणाऱ्यांवर यानंतरच्या काळातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 
- अभय परमार, पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

SSC HSC Supplementary Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी होणार जाहीर

ST Bus: पंढरपूर वारीसाठी एसटीची धाव! राज्यभर ५५०० विशेष बसचे नियोजन; महिलांना ५०% सवलत, तर 'या' प्रवाशांना मोफत प्रवास

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

SCROLL FOR NEXT