पश्चिम महाराष्ट्र

‘सकाळ’तर्फे २८ पासून ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी ठरणार आहे. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या संवादाने या संवाद मालिकेला प्रारंभ होणार आहे. 

दरम्यान, सलग पाचव्या वर्षी हा कार्यक्रम होणार असून, नामवंत वक्‍त्यांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. तनिष्क शोरूम, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मार्व्हलस इंजिनिअर्स सहप्रायोजक आहेत, तर हॉटेल सयाजी हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे. आपापल्या क्षेत्रात यशोलौकिकाचे शिलेदार ठरलेली ही मंडळी प्रत्येकातील नवचेतना जागवताना नेटाने पुढे जाण्यासाठीची ऊर्जाही देणार आहे.

कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असेल. ‘सकाळ’ने चार वर्षांपूर्वी या अनोख्या उपक्रमाला प्रारंभ केला.  बॉलिवूड  निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार सुभाष घई, प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुप- बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे हणमंतराव गायकवाड, ‘सुपर थर्टी’चे संस्थापक आणि गणितज्ज्ञ आनंद कुमार, ज्ञानेश्‍वर मुळे, प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पटेल, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, दिग्दर्शक अभिनय देव, फ्लेम युनिव्हर्सिटीचे संस्थापक संचालक पराग शहा, ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, अभिनेता श्रेयस तळपदे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा आदींशी दिलखुलास संवाद साधण्याची संधी मिळाली होती. चला तर मग, आजच वेळेचे नियोजन करूया. २८ फेब्रुवारी ते ३ मार्चची सायंकाळ नवप्रेरणादायी करूया...!

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ उपक्रमाला गेली पाच वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती रंगतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT