आटपाडी (जि. सांगली) : थकित वीज बिल सौजन्याने वसुलीला लोकांचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मात्र -पूर्वसूचना न देता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वसुलीसाठी दाखवलेल्या अमिषापोटी शेतकरी ग्राहकांना अर्वाच्य भाषा वापरून चुकीच्या पद्धतीने वसुली चालू केली आहे. चुकीच्या पद्धतीने आणि जबरदस्तीने वीज बिलाची वसुली आणि कारवाई केल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आमदार अनिल बाबर यांनी महावितरण कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.
महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक वीज कनेक्शन तोडली. अनेक गावचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. याच्या तक्रारी आमदार अनिल बाबर यांच्याकडे पोहोचल्या. त्याआधारे आमदार अनिल बाबर यांनी महावितरण कोल्हापूर विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सडेतोड आणि रोखठोक पत्र पाठवून चुकीच्या पद्धतीच्या वसुलीवर तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे.
कोरोनाची साथ आणि विविध कारणामुळे बहुतांश शेतकरी, वीज ग्राहक, उद्योजक, व्यावसायिक आणि पाणी संस्थांचे विज बिल वर्षभर थकले आहे. वर्षभर बिलाचा आकडा वाढत गेला. घाटांचा पर्यंत प्रत्येक महिन्याला बिले पोहोचली नाहीत. अधिवेशन संपताच महावितरण विभागाने थेट वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. वसुली करताना तारतम्य न बाळगल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
आटपाडी तालुक्यात घरगुती, उद्योग, व्यवसाय आणि पाणी संस्थांची वीज थकबाकी 72 कोटीवर आहे. यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे साडेतीन कोटी रुपये थकबाकी आहे. वेळप्रसंगी विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे. आमदार श्री. बाबर यांनी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या पत्रात कोरोना, वीज बिल वसुली, ग्राहकांना दर महिन्याला वेळेत बिले न मिळणे, त्यामुळे बिले भरणे शक्य झाले नसल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी एका वेळी सर्व ग्राहक वीज बिल भरू शकत नाही.
महावितरणच्या अधिकारी अर्वाच्च भाषा
महावितरण अधिकाऱ्यांना वसुलीसाठी दाखवलेल्या आमिषातून अधिकारी अर्वाच्च भाषेतुन आणि चुकीची पद्धत वापरून थकीत वीज बिलाची वसुली करीत असल्याचे म्हटले आहे. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी आणि सौजन्याने वीज बिलाची वसुली करावी अशी मागणी केली आहे. योग्य पद्धतीने वसुली केल्यास लोकांचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मात्र जबरदस्तीने चुकीची पद्धत वापरल्यास विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.