Election-Commission
Election-Commission 
पश्चिम महाराष्ट्र

निवडणुकीसाठी क्रीडासंकुलाचा वापर!

सकाळवृत्तसेवा

सातारा - आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने नुकतीच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली आहे, तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची क्रीडा संकुलांचा वापर हा निवडणुकांच्या कामासाठी नको, ही भूमिका तसेच नागपूर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या निर्णयाची प्रत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने जिल्हा निवडणूक विभागास पाठवली आहे. या बाबी पाहता जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल नेमका काय निर्णय घेतात? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. 

जिल्ह्यातील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी यापूर्वी छत्रपती शाहू स्टेडियममधील बॅडमिंटन हॉल, इमारतीचा वापर केला जात होता. यामध्ये मतदान यंत्रांची साठवणूक करणे, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान यंत्रांचे वाटप करणे, मतदानानंतर ती यंत्रे जमा करून घेणे तसेच मतमोजणी करणे आदींसाठी वापर केला जात होता. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीनंतर हे क्रीडा संकुल खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी, निवडणुकांच्या कामकाजासाठी देऊ नये, अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली होती. एका बॅंकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळीस क्रीडा संकुलातील सुविधांचे झालेल्या नुकसानीचे तसेच अन्नपदार्थांचा कचरा याचे छायाचित्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडाप्रेमींनी दाखविले होते. सातारकर क्रीडाप्रेमींची भावना लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा संकुल समितीने खेळाव्यतिरिक्त अन्य बाबींकरिता क्रीडा संकुल देऊ नये, असा ठरावदेखील केला.

आगामी काळातील निवडणुकांसाठीच्या नियोजनासाठी तसेच कामकाजासाठी क्रीडा संकुलाचा वापर होऊ शकतो, यासाठी नुकतीच जिल्हा निवडणूक विभागाने पाहणी केली. सध्या क्रीडा संकुलात दररोज वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी शेकडो खेळाडू येतात. यामध्ये सर्वाधिक खेळाडू हे बॅडमिंटन, जलतरण, मैदानी स्पर्धांमधील आहेत. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा, शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा, एकविध क्रीडा संघटनांच्या स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे नियोजन असते. खेळाडूंचा दैनंदिन सराव बुडू नये तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये व्यत्यय येऊ नये, असा सूर क्रीडाप्रेमींमधून उमटू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT