Vehicle Blocked Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावमधील मोर्चामुळे कोगनोळी नाक्यावर वाहने अडविली

बेळगाव येथील विधानसभा अधिवेशनावर काँग्रेसतर्फे मोर्चा काढला होता. या मोर्चासाठी रॅली राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने वाहनांची जास्त गर्दी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी - बेळगाव (Belgaum) येथील विधानसभा अधिवेशनावर काँग्रेसतर्फे मोर्चा (Congress March) काढला होता. या मोर्चासाठी रॅली राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने वाहनांची (Vehicle) जास्त गर्दी झाली होती. येथील गर्दी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर गुरूवारी (ता. १६) दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास वाहने रोखून धरण्यात आली.

कोगनोळी येथील नाका नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता बेळगावजवळ गर्दी झाल्याने वाहनधारकांना ताटकळत रहावे लागले. सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ येथे वाहने अडवून ठेवली होती. त्यामुळे टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोगनोळी पोलिस उपठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी म्हणाले, बेळगाव विधानसभा विधानसौधजवळ मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी वाहने अडविली आहेत. बेळगाव येथील वाहनांची गर्दी कमी झाल्यावर या ठिकाणची वाहने सोडली जातील. यावेळी पोलिस राजू गोरखनावर, एस. एच. गाडीवड्डर, एस. बी. आवटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT