Chandrakant Patil
Chandrakant Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : लबाड कोल्हे, लबाड कोल्हे....यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महायुतीच्या विरोधात भूमिका घेणारे आणि बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी येत्या पाच दिवसांत मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करावी; अन्यथा सर्वच दारे बंद होतील, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिला.

खासदार प्रा. संजय मंडलिक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांचा इशारा सूचक मानला जातो. 

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘मेजर प्रॉब्लेम’ होतील. हा उरलासुरला पक्षही फुटेल, अशी भविष्यवाणी पालकमंत्र्यांनी आजच्या सभेत केली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीत सध्या एक नेता आणि एक वक्ता अशी दोनच माणसे राहिली आहेत. या वेळी उपस्थितांतून अमोल कोल्हे यांच्यावर लबाड कोल्हा, लबाड कोल्हा अशी टिप्पणी झाली.

त्या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंचाही पालकमंत्र्यांनी समाचार घेतला. सर्वांना बाहेर काढून सतेज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्याची टीका करत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे आमचा बालेकिल्ला, आमच्या बापाची पेंड आहे, असे म्हणून या विभागाला लुटले आहे. गेल्या पाच वर्षांत महायुतीने खूप कामे केली आहेत. कोल्हापूरला काय केले नाही? रस्ते, टोलमुक्ती, विमानतळ विस्तारीकरण, तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी निधी, नृसिंहवाडीसाठी निधी अशी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे ही कामे नाकारून दोन्ही काँग्रेसला मतदान करण्याइतपत जनता नतद्रष्ट नाही. त्यामुळे या वेळी जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच्याच येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT