Vidhan Sabha 2019 shiv sena mp sanjay mandlik was absent at amit shah rally kolhapur
Vidhan Sabha 2019 shiv sena mp sanjay mandlik was absent at amit shah rally kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : अमित शहांच्या सभेला कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार अनुपस्थित 

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची आज, कोल्हापुरात जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला भाजपसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेना महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. परंतु, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

मंडलिक-महाडिक मतभेद
कोल्हापुरातील शिवसेना-भाजप यांच्यातील विशेषतः भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक आणि शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आपलं ठरलंय, असा संदेश देत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याऐवजी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना साथ दिली होती. आता मंडलिक यांनी किमान कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी तरी, युती धर्म मोडल्याचे दिसत आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच त्यांना इशारा दिला होता. 'एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही,' अशा शब्दांत त्यांनी मंडलिका यांना सुनावले होते. पण, मंडलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य फारसे मनावर घेतले नसल्याचे दिसत आहे. 'लोकसभेत आमदार अमल महाडिक यांनी कुठं माझ्यासाठी प्रचार केला होता,' अशी भूमिका प्रा. मंडलिक यांनी घेतल्याचे समजते. 

काय आहे पार्श्वभूमी?
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांच्या रुपाने शिवसेनेला कोल्हापुरातून पाहिला खासदार मिळाला. शिवसेना-भाजपची एकत्रित ताकद आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या मदतीच्या जोरावर मंडलिक यांचा विजय साकार झाला. त्यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक रिंगणात होते. आता महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक रिंगणात आहेत. धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून रिंगणात असताना, अमल महाडिक भाजपमध्येच होते. त्यावेळी त्यांनी युती धर्म पाळला नाही. त्यांनी मंडलिक यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या एकाही व्यासपीठावर उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत खासदार मंडलिक त्यांच्या व्यासपीठावर दिसत नाही. लोकसभेला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रा. मंडलिक यांना रसद पुरवली होती. आता सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज कोल्हापूर दक्षिण मधून विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात रिंगणात आहेत. त्यामुळे खासदार मंडलिक तटस्थ राहून लोकसभेच्या मदतीची परतफेड करत असल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT