विजयी मिरवणूक काढली sakal
पश्चिम महाराष्ट्र

नगरपंचायत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे डॉ.उदयसिंह विजयसिंह हजारे यांची निवड

जेसीबीने गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आपला उत्साह दाखविला

सकाळ वृत्तसेवा

खानापूर: येथील नगरपंचायत नगराध्यक्षपदी काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीचे डॉ.उदयसिंह विजयसिंह हजारे यांची निवड झाली. डॉ.हजारे यांच्या निवडीने युवा नेते सुहास (नाना) शिंदे व आमदार अनिल (भाऊ) बाबर यांच्या गटाची सत्ता आबाधीत राहिली.आज झालेल्या नगराध्यक्ष निवडणूकीत डॉ.उदयसिंह हजारे यांनी जनता आघाडीचे राजेंद्र माने यांचा ९ विरुद्ध ८ असा पराभव करून विजय मिळविला.उपनगराध्यक्षपदी सुवर्णा प्रल्हाद कांबळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्ष निवडणूकीत सुवर्णा कांबळे यांनी जनता आघाडीचे रोहित त्रिंबके यांचा ९ विरुद्ध ८ असा पराभव केला.निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सचिन भोर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी काम पाहिले.

निवडीनंतर काढलेल्या मिरवणुकीत आमदार अनिल (भाऊ) बाबर, युवा नेते सुहास शिंदे, नूतन नगराध्यक्ष डॉ.उदयसिंह हजारे, नूतन उपनगराध्यक्ष सुवर्णा कांबळे, ज्येष्ठ नेते लालासाहेब पाटील,माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग डोंगरे,शिवसेना तालुकाप्रमुख दादा भगत,विजयी उमेदवार गटनेत्या मेघना हिंगमिरे, सुनिल मंडले,सुमन पाटील, चंदना भगत, जैबून पीरजादे,जयश्री मंडले, मानकाताई ठोंबरे,डॉ.वैशाली हजारे,प्रकाश भगत,बबनराव माने,सुभाष डोंगरे,शिवतेज माने,राजेंद्र टिंगरे,रायसिंग मंडले, प्रभुराज पाटील,राजन पवार,गौरव पाटील,दत्तात्रय माळी,ओंकार पाटील,विकास भगत,बलराज माने,अँड.अभिजित गायकवाड,विजय भगत,सदाशिव भगत,उमेश धेंडे, बाळु धेंडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी शहरातून फटाक्यांची आतिषबाजी करीत गुलाल उधळीत हलगीच्या गजराने विजयी मिरवणूक काढली. जेसीबीने गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आपला उत्साह दाखविला. यावेळी सुहास शिंदे,डॉ.उदयसिंह हजारे यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येणार - भरणे

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT