पश्चिम महाराष्ट्र

गावातील माणुसकी आटली : २२ तासानंतरही मृतदेह जागेवरच; अखेर ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः गोळेवाडी (ता. काेेरेगाव) येथे शनिवारी गजानन पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरात फक्त वृध्द आई आणि बहिण या दाेघीच. भावाचा मृत्यू झाल्याने बहिणीने आक्राेश केला. पवार यांच्या मृत्यूची बातमी गावात देखील पाेहचली. मात्र या गावातील एकही ग्रामस्थ घरा बाहेर पडला नाही. गावकरींनी तहसिलदारांपर्यंत निराेप पाेहचविला. तलाठय़ांना कळविण्यात आले. तसेच पवार यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी त्यांच्यावर साेपविणयात आली. तलाठी मात्र गावाकडे गेले नाही.

तब्बल २२ तास मृतदेह घरात राहिल्याने दुर्गंधी पसरू लागली. गजाननच्या आई, बहिणीने अनेकांना अंत्यविधीसाठी आवाज दिला. मात्र कोणीही आले नाही. अखेर पोलीस पाटील दीपक शिंदे, ग्रामसेवक नीलेश बर्गे,सतिश गोळे, महेश बर्गे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश कदम, नवनाथ पवार यांनी रविवार दि.२९ रोजी अंत्यसंस्कार केले. जवळचा एकही नातेवाईक, ग्रामस्थ न आल्याने ग्रामसेवक नीलेश बर्गे यांनी भडाग्नी दिला.

कोरोनाची दहशत आणि संचारबंदीमुळे अत्यंसंस्कारालाही कोणीही ना नात्यातील, ना गावातील आले नसल्यामुळे माणुसकीही आटली असेच म्हणावे लागेल. जगभरात कोरोनाची दहशत आणि त्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदी
लागू केल्याने ग्रामीण भागात ही घराबाहेर कोणी पडत नाही.

कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडीत गजानन पवार हे वृध्द आई आणि बहिणी सोबत राहत होते. काही दिवसांपासून पत्नी विभक्त राहते. शनिवारी ता. २८  गजानन पवार यांचे दुपारच्या सुमारास अल्पशा आजाराने घरीच निधन झाले. पवार यांचे निधन झाल्याने आई, बहिणीची पाया खालची वाळू सरकली. त्यांनी याबाबतची माहिती नजीकच्या ग्रामस्थांना दिली. काेराेनाच्या भितीने ना नात्यातील, ना गावातील कोणीच आले नाही. काेणीतरी घटनेची माहिती तहसिलदारांपर्यंत पाेहचवली. त्यांनी तलाठय़ांना तातडीने योग्य सहाय्य करण्याचे आदेश दिले. तलाठय़ांनी गावातूनच मदत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काेणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. अखेर तलाठ्यांनी देखील त्याकडे पाठ फिरवली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी देखील घटनेची कल्पना असूनही दुर्लक्ष केले.

दूसरीकडे मृतदेहाची दुर्गंधी सुटली. ज्यांना त्याचा वास येत होता ते एकमेकांना संपर्क करत हाेते. यातून आपली सुटका व्हावी, असा प्रयत्न करत होती. परंतु घराबाहेर काेणीच पडले नाही. अखेर ग्रामसेवक निलेश बर्गे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश कदम, नवनाथ पवार यांनी पुढाकार घेत पोलीस पाटील दीपक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतिश गोळे, महेश बर्गे यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. कोरेगाव नगरपंचायतीचा वैंकुंठ रथ ही गाडी बोलावून त्यातून गजानन पवार यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमीत नेले. पवार यांचे काेणीही नातेवाईक उपस्थित नसल्याने ग्रामसेवक निलेश बर्गे यांनी भडाग्नी देण्याचे कार्य पार पाडले. 

सावधान : क्रिकेट खेळल्याबद्दल 'त्यांच्यावर' झाला गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT