Want to play power with support? Vilasrao Jagtap's question to Sanjay patil about change in ZP
Want to play power with support? Vilasrao Jagtap's question to Sanjay patil about change in ZP 
पश्चिम महाराष्ट्र

टेकू असलेल्या सत्तेत खेळ करायचा? जि.प. बदलाबाबत जगतापांचा संजयकाकांना सवाल

अजित झळके

सांगली ः महापालिकेत स्पष्ट बहुमत असताना भाजपला महापौरपद राखता आले नाही. अडीच वर्षे सत्ताकाळ बाकी असताना सहा नगरसेवक फुटले, जिल्हा परिषदेत बदल करण्याचा विचार करण्याआधी हा धोका लक्षात घ्या. टेकू असलेल्या सत्तेत बदलाचा खेळ अंगाशी आला तर तोंडावर पडू, असा स्पष्ट इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय पाटील यांना दिला आहे. 


जत येथील श्री. जगताप यांच्या निवासस्थानी संजय पाटील यांची सुमारे दोन तास चर्चा केली. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. आसंगी (ता. जत) येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार तिकडे गेले होते. त्या कार्यक्रमावर श्री. जगताप यांनी अलिखित बहिष्कार टाकला. राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनीही पाठ फिरवली. त्या कार्यक्रमातील या गैरहजेरीबाबत उघडपणे चर्चा झडल्यानंतर खासदार पाटील यांनी परतीच्या प्रवासात जगताप यांचे घर गाठले. 


जिल्हा परिषदेत अध्यक्ष, सभापती बदलाबाबत एक गट आग्रही आहे. तो खासदार पाटील यांच्या अधिक संपर्कात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापौर निवडीत झटका बसल्यानंतर जिल्हा परिषदेबाबत सावध भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील नेत्यांचे एकमत करा आणि मग मला निरोप पाठवा, असे सांगितले आहे. त्याबाबत खासदारांनी जगताप यांच्याशी चर्चा केली.

त्यावेळी जगताप यांनी टेकू असलेल्या सत्तेत आमदार अनिल बाबर, महाडिक गट, अजितराव घोरपडे गट महत्त्वाचा असून, बदलाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे का? असा सवाल केला. ती आधी करा, त्यांचा होकार असेल, ते बदल करताना भाजपसोबत राहणार असतील; तर मग भाजपची बैठक घेऊ, बदल करून कुणाला संधी द्यायची हे ठरवू, त्यावर पुन्हा सहयोगी नेत्यांचे मत आजमावू आणि मग पुढे जाऊ, अशी भूमिका मांडली. त्यावर खासदार पाटील काय भूमिका घेणार? ते टेकूधारी नेत्यांशी बोलणार का, याकडे आता लक्ष असेल. 


आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक, बाजार समिती निवडणुकांबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकमेकांचा अंदाज घेतला गेला. कुणी कुणाला शब्द दिला नाही, असे सांगण्यात आले. 
 

खासदार-जगताप सूर पुन्हा जुळतील? 
खासदार संजय पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातील सूर लोकसभा निवडणुकीनंतर बिघडले आहेत. खासदार पाटील यांनी जत, तसेच तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात घेतलेल्या भूमिकेवरून जगताप नाराज आहेत. 2019 च्या लोकसभेला खासदार पाटील यांनी उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये विरोधाचा सूर असताना जगताप यांनी खासदारांसाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर मात्र संवाद थांबला होता. कालच्या बैठकीनंतर तो पुन्हा जुळेल का, याकडे लक्ष असेल.

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT