इस्लामपूर (सांगली) : इस्लामपूर शहरातील जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हे लोक अशा त्रासात कसे राहतात, हा प्रश्न आहे. लोकांच्या प्रभागनिहाय समस्या जाणून घेतल्यानंतर त्याची जाणीव झाली. नगराध्यक्ष त्यांच्या वैयक्तिक प्रश्नातच गुंतून पडले आहेत, त्यामुळे त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसावा, अशी टीका जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली.
गेल्या आठवड्यात मंत्री जयंत पाटील यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधला, जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांच्यासमोर आपले मौन सोडले. ते म्हणाले, "इस्लामपूर शहरातील नागरिकांनी मला नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळे लोकांना भेटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे. लोकांना भेटल्यावर त्यांचे प्रश्न कळतात. आष्टा येथेही मी बैठका घेतल्या.
आष्ट्याच्या तुलनेत इस्लामपुरच्या जनतेचे प्रश्न गंभीर आहेत. हे लोक कसे काय सहन करत असतील? डेंग्यूची साथ आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत. नगराध्यक्ष नगरपालिकेत येत नाहीत. ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांतच अडकून पडल्यामुळे त्यांना शहरातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसावा. अशा लोकांनी पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे. परवा दीड महिन्यांनी ते पालिकेत आल्याचे समजले. शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. भाजपचे सरकार असताना विकासकामांसाठी निधीच आला नाही.
निधी एकतर सरकारने दिला नसावा किंवा तो निधी आणण्यात स्थानिक पदाधिकारी कमी पडले असावेत. त्यांच्या काळात जी कामे झालीत ती आधीच्या आमच्या सरकारच्या काळात मंजूर असलेलीच कामे होती, नवीन कामे आणि निधीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले आहेत, लवकरच कामे सुरू होतील."
संपादन-अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.