Water samples were contaminated 
पश्चिम महाराष्ट्र

76 गावांतील 86 पाणीनमुने दूषित 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे 1879 नमुने तपासले. त्यांमध्ये 76 गावांतील 86 नमुने दूषित आढळून आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यांच्यातर्फे मागील महिन्यात पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 86 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे. दर महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पाणीनमुने तपासले जातात. या वर्षात मागील महिनाअखेरपर्यंत 19 हजार 77 नमुने तपासण्यात आले. त्यांतील 1062 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला आहे.

नगर तालुक्‍यात सर्वाधिक नमुने दूषित आढळून आले. त्याखालोखाल संगमनेर तालुक्‍याचा क्रमांक लागतो. 

दूषित पाणी असलेली गावे ः 
पारनेर ः राळेगण थेरपाळ, कोहकडी, रांजणगाव, कारेगाव. अकोले ः शेरणखेल. नगर ः चास, बारादरी, मेहेकरी, भातोडी, पारगाव, पारेवाडी, केकती, बाराबाभळी, वडारवाडी, वैद्य कॉलनी, बदडगाव, हिंगणगाव. संगमनेर ः निमगाव बुद्रुक, निमज, शिरापूर, वाघापूर, संगमनेर खुर्द, रायतेवाडी, कौठे मलकापूर, पळस खेडे, घुलेवाडी. शेवगाव ः कांबी, एरंडगाव समसूद, मुंगी. पाथर्डी ः टाकळीमानूर, पारेवाडी, भालगाव, जवखेडे खालसा. 
राहुरी ः माहेगाव बैरागीबाबा. जामखेड ः सारोळा, काटेवाडी. कोपरगाव ः कारवाडी, कोळगाव थडी, डाऊच बुद्रुक, देर्डे कोऱ्हाळे, पोहेगाव बुद्रुक. कर्जत ः बजरंगवाडी. नेवासे ः पाथरवाला, नजीक चिंचोली, वाकडी. 
राहाता ः कोऱ्हाळे, रामपूरवाडी. श्रीरामपूर ः मालुंजे, खोकर. 

श्रीगोंदे निरंक 
मागील महिन्यात श्रीगोंदे तालुक्‍यातील पाण्याचे 162 नमुने तपासण्यात आले. त्यांतील एकही नमुना दूषित आढळून आला नाही. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy: कोणतीही भाषा शिकणं वाया जात नाही, त्रिभाषा धोरणाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Jalgaon Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा होणार सक्रिय! जळगाव जिल्ह्यात 'या' तारखेपासून वाढणार पावसाचा जोर? 35 ते 40 किमी वेगाने वाहणार वारे

Maharashtra News: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे; बावनकुळेंची माहिती : ‘डीपीडीसी’च्या निधीतून तरतूद करणार

पुन्हा सिलिंडरचा तुटवडा? LPG पुरवठ्यावर संकटाची छाया; इराणची कठोर भूमिका, तेल-वायू निर्यातीबाबत मोठी धमकी!

Jalgaon Crime : क्रूरतेचा कळस ! मूल अंध जन्माला आले म्हणून मायलेकांना विहिरीत ढकलले; बालकाचा मृत्यू, आई थोडक्यात बचावली

SCROLL FOR NEXT