The water from the wells has stopped 
पश्चिम महाराष्ट्र

भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी आटले

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (नगर ) ः तालुक्‍याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळच्या भागवत मळा, बावपठार भागातील काही शेतकऱ्यांच्या विहिरींना तडे जाऊन, पाणी आटल्याने पठार भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी ः नांदूर खंदरमाळ गावातील भागवत मळा, बावपठार येथील राधू सखाराम भागवत यांच्या घराजवळील 50 फूट खोल विहिरीतील पाणी मंगळवारी रात्रीपर्यंत होते. मात्र, बुधवारी सकाळी पाणी तळाला गेले असून, काही ठिकाणी तडे गेल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची चर्चा गावात होताच, गोपीनाथ भागवत, आप्पा भागवत, नाना भागवत याही शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी तळाला गेल्याचे समजले. या परिसरात भूकंपाच्या भीतीने घबराट निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्‍यातील पठार भाग हा "डेक्कन ट्रॅप' या भूकंपप्रवण भागावर असल्याने, या परिसरातील घारगाव, बोटा, केळेवाडी, आंबी खालसा या ठिकाणी दोन-तीन वर्षांपासून भुकंपसदृश हालचाली जाणवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या घटनेची जोरदार चर्चा पठारात रंगली होती. 

याबाबत माहिती समजल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेरच्या महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना आज दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून अधिक माहिती घेतली. याबाबत पठारातील ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करीत त्यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून याविषयी अधिक संशोधन करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्याची मागणी केली आहे. 

अशा घटनांमागे भूगर्भीय हालचाली 

या घटनेबाबत नाशिकच्या "मेरी' संस्थेतील वरिष्ठ भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांच्याशी संपर्क केला असता, कोणत्याही प्रकारे भूकंपाच्या धक्‍क्‍याची नोंद "मेरी'त झाली नसल्याचे स्पष्ट करीत, अशा घटनांमागे भूगर्भीय हालचाली असल्याने, भूगर्भ शास्त्रज्ञांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. 
- अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT