sangli 
पश्चिम महाराष्ट्र

दुकाने उघडणार, हवे तर जेलमध्ये टाका

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्‍यक उपाययोजना करून शहरातील प्रमुख व्यापारी पेठा सरसकट उघडण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी आम्ही तीन दिवस वाट पाहू. अन्यथा, चौथ्या दिवशी सर्व दुकाने उघडू. आमच्यावर काय करायची ती कारवाई करा, आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल, अशी भूमिका व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र ते सकारात्मक नाहीत. पालकमंत्री, खासदार, आमदारांना व्यापाऱ्यांच्या प्रश्‍नाशी देणेघेणे नाही. पाणी गळ्यापर्यंत आले आहे. असेही मरणार आणि तसेही मरणार, अशी अवस्था आहे. त्याबाबत सरकार आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांशी समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे असताना विचित्र भूमिका का घेतली जात आहे, असा सवाल श्री. शहा यांनी केला.


ते म्हणाले, ""कोरोनाचे संकट मोठे आहे. आम्ही लॉकडाऊन पूर्णपणे पाळला. व्यापाऱ्यांनी सुमारे सात लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीला दिली. आता व्यापारी जगला पाहिजे. मुंबई, पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर येथील व्यापारी पेठा सुरु झाल्या आहेत.

राज्य शासनाने स्थानिक पातळीवर प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी समन्वयातून निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत. आम्ही दररोज चार तास दुकान चालवू. काळजी घेऊ, सोशल डिस्टन्स पाळू, सॅनिटायझर वापरू, असे सारे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देणे अपेक्षित होते. तसे झालेले नाही.''

ते म्ङणाले, ""शहरात जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावाखाली दुकाने सुरु आहेत, प्रचंड गर्दी होते आहे. दारु दुकाने सुरु झाल्यानंतर रांगा साऱ्यांनी पाहिल्या आहेत. अनेक ठिकाणी सकाळी गर्दी पहावी. या ठिकाणी सूट आणि व्यापारी पेठांचीच गळचेपी कशासाठी? अर्थकारण अडचणीत आहे, महापुराने मोडलेला व्यापारी या स्थितीत संपून जाईल. मे अखेरीस लॉकडाऊन वाढला तर काय? पावसाळ्यात व्यवसाय होत नाही. पुन्हा महापुराची भिती आहे. आमची ही दुखणी कुणी समजूनच घेणार नाही का?
-----------
व्यापाऱ्यांचा प्रस्ताव

* शहरांतर्गत व्यापार खुला करा
* रोज चार तास दुकाने उघडू द्या
* सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या
* व्यापाऱ्यांच्या कर्जाचे वर्षाचे व्याज माफ करा
* कर्ज परतफेडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ द्या
* व्यापारी पाणीपट्टी, घरपट्टी आणि वीजबील माफ करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT