Wedding Live and Ecofriendly Decoration
Wedding Live and Ecofriendly Decoration 
पश्चिम महाराष्ट्र

वेडिंग लाईव्ह अन्‌ इकोफ्रेंडली सजवटही! 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : परंपरा जपताना येथील तरूणाईने आता विवाह सोहळ्यांतही नवसंकल्पना पुढे आणल्या आहेत आणि त्या चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. यंदाच्या लग्नसराईत प्री-वेडिंग फोटोसेशनबरोबरच वेडिंग लाईव्ह आणि इकोफ्रेंडली थीम डेकोरेशनलाही मागणी आहे. दरम्यान, लग्नाची हौस करता न आलेल्या दांपत्यांनी आता पोस्ट वेडींग फोटोसेशनवरही भर दिला असून ही संकल्पनाही शहर आणि परिसरात रूजते आहे. 

पूर्वीचे विवाह सोहळे हे घरच्या घरी अथवा मंदिरात पार पाडण्याची परंपरा अजूनही काही ठिकाणी असली तरी आता मंगल कार्यालये, लॉन्स, ग्राऊंड आणि हॉटेल असा या सोहळ्याचा प्रवास सुरू झाला आहे. बदलता काळ आणि हाती आलेला पैसा, हौस आणि प्रतिष्ठा म्हणूनही आता दिमाखदार विवाह सोहळ्यांना महत्त्व आले असून वेडिंग प्लॅनर्सना मागणी वाढली आहे. किंबहुना विविध थीमवरही विवाह सोहळे रंगू लागले आहेत. या थीम अगदी इन्व्हिटेशन कार्ड ते मेनू अशा सगळ्या गोष्टींमध्ये राबविता येतात. 

इकोफ्रेंडली थीमचा विचार करताना प्रवेशव्दारातील अगदी रांगोळीपासून ते मुख्य मंडपातील व्यासपीठापर्यंत आणि जेवण व्यवस्थेच्या हॉलपर्यंत सर्व सजावट इकोफ्रेडली भर दिला जातो आहे. त्यासाठी कागद, विविधरंगी कापडांसह पाना-फुलांचा वापर केला जातो. डेकोरेशन करताना सह्याद्रीच्या खोऱ्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, पालघर, मोखाडा आदी अनेक आदिवासी संस्कृतीतून निर्माण झालेल्या "वारली' असो किंवा इतर भारतीय कलाप्रकारांचाही वापर केला जातो आहे.

साधारणतः थिम्स या कलर स्कीम किंवा एखादा काळ, संस्कृती यांवर ठरवल्या जातात. यामध्ये डिस्को, काऊबॉय, हवाईयन, वेस्टर्न, राजस्थानी, महाराष्ट्रीयन थीम या पॉप्युलर आहेत. कलर स्किम्समध्ये रेड आणि व्हाइट, रेड आणि यलो, परपल, ओन्ली व्हाइट अशा काही स्किम्स लोकप्रिय आहेत. दागिण्यांचा विचार करता पारंपरिक दागिण्यांमध्ये थोडे बदल होऊन नवीन डिझाइन्स तयार होत आहेत. लग्नसराईसाठीही पारंपरिकतेसह आधुनिक दागिन्यांना मागणी वाढत आहे. 

केटरींगमध्येही आता बरेच बदल झाले असून अगदी वेलकमपासून ते जेवणापर्यंत विविध प्रकारच्या डिस्प्लेना सध्या मोठी मागणी आहे. मोबाईल सेवेचा ट्रेंडही आता रूजू लागला आहे. 
- उत्कर्ष दुधाणे, केटरर्स 

प्री वेडींगबरोबर आता पोस्ट वेडींग शूट आणि फोटोसेशनची संकल्पना शहर आणि परिसरात रूजू लागली आहे. प्रत्येक छायाचित्रकाराची फेव्हरीट लोकेशन्सही वेगळी आहेत. विशेषतः लग्नाची हौस करता न आलेल्या दांपत्यांचा या संकल्पनेकडे ओढा असून पन्नास हजारपासून ते अगदी साडेतीन ते चार लाखांपर्यंतची पॅकेजीस उपलब्ध आहेत. 
- जयसिंग चव्हाण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT