पश्चिम महाराष्ट्र

Lockdown Update - बेळगावात पुन्हा विकेंडसह नाईट कर्फ्यू

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षेतखाली आज विविध विषयावर व्यापक चर्चा झाली.

महेश काशिद

बेळगाव : कोविड नियंत्रण, (covid -19) शाळा सुरु करण्यासह सीमाभागात विकेंड (weekend and night curfew) व नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बंगरुळला आयोजित बैठकीत आज (६) घेण्यात आला. काही दिवसांपासून निर्बंध शिथिल करून नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु आता पुन्हा निर्बंधांची घोषणा केली आहे. (belgaum update)

मुख्यमंत्री बोम्मई (cm bommai) यांच्या अध्यक्षेतखाली आज (ता.६) विविध विषयावर व्यापक चर्चा झाली. त्यानंतर महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यामध्ये शाळा दोन टप्प्यात सुरु (school start) करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. येत्या २३ ऑगस्टला ९, १० आणि पीयूसी वर्ग सुरु केले जातील. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑगस्ट अखेरला प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यात नाईट कर्फ्यू रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत लागू करण्यात येणार आहे. त्यासोबत विकेंड कर्फ्यू असणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी विविध व्यवहार आणि कामकाजावर निर्बंध लादले जाणार आहेत. पण, त्याचे स्वरुप काय असणार आहे, हे अजून स्पष्ट नाही. याबाबतचा आदेश लवकर राज्य सरकारतर्फे घोषित केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT