Weekly market started in Sangli; corona rules Binding to customers as well as sellers 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील आठवडा बाजारास प्रारंभ; कोरोना नियमांचे पालन; विक्रेत्यांसह ग्राहकांनाही बंधनकारक

शैलेश पेटकर

सांगली : कोरोना प्रादुर्भावानंतर गेले सहा महिने बंद असलेला शहरासह जिल्ह्यातील आठवडा बाजार पुन्हा सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे जिल्हा आणि जिल्हा बाहेरील विक्रेत्यांनी, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आठवडा बाजारात थाटली होती. शनिवारच्या बाजारात ग्राहकांचा प्रतिसाद दिसून आला. मात्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. मास्क वापरण्याची सक्ती बाजारात केली जात आहे. 

कोरोना महामारीनंतर एप्रिल महिन्यापासून हा बाजार बंद करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत टप्प्याटप्याने सारी काही सुरू करण्यात आले होते. मात्र आठवडा बाजार सुरू करण्यात आले नव्हते. ते तातडीने सुरू करण्यासाठी जनसेवा फळ, भाजी, खाद्यपेय विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात आले.

लॉकडाउन काळात सेवा देणाऱ्या भाजी विक्रेत्यांची गेल्या सहा महिन्यापासून उपासमार सुरू असल्याचे ठणकावून सागण्यात आले. राज्यव्यापी आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आली. अखेर कालपासून आठवडा बाजारास परवानगी देण्यात आली. काल सांगली शहरातील काही भागात बाजार भरविण्यात आला. मात्र, ग्राहकांना अद्याप माहिती नसल्याने अत्यल्प प्रतिसाद मिळाला. आज शनिवारच्या बाजारात ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. 

भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करण्याची सक्ती केली जात आहे. मास्कचा वापर करण्यासाठी आग्रह केला जात आहे. घटनस्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर आज बाजारपेठेत गर्दी दिसून आले. त्यामुळे विक्रेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

बाजारात उत्स्फुर्त प्रतिसाद

आठवडा बाजार सुरू करण्यासाठी आंदोलन उभारण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले. कालपासून बाजार सुरू करण्याचा निर्णय झाला. विक्रेत्यांनी मास्कसह सॅनिटायझर व अन्य सुरक्षिततेची साधने वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. आजच्या बाजारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
- शंभोराज काटकर, अध्यक्ष, जनसेवा फळ, भाजी, खाद्यपेय विक्रेता संघटना 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT