Ujjawal Nikam 
पश्चिम महाराष्ट्र

जाणून घ्या! काय होऊ शकतात हैदराबाद एन्काउंटरचे परिणाम (Video)

अशोक मुरुमकर

सोलापूर : हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा आरोप असलेले चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. या एन्काउंटर प्रकरणाबाबत अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर काहींनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मात्र, घटनेचे दीर्घकालीन काय परिणाम होऊ शकतात, याबाबत पुढे काय होणार, असे एक ना अनेक प्रश्‍न अनेकांच्या मनात आहेत. त्याबाबत राज्य सरकारचे विशेष वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्याशी येथील "सकाळ' कार्यालयात मंगळवारी संवाद साधला... यावर त्यांनी व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दात... 

हेही वाचा : अबब ! चप्पल तीही 25 हजारांची अन्‌ सह किलोची... 
कुठे तरी आम्ही कमी पडतो आहोत... 

ऍड. निकम म्हणाले, हैदराबादमधील घटना हा खरोखर ज्वलंत प्रश्‍न आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे, की यामध्ये जे काय दोषी असतील त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र चौकशी व्हावी, गुन्हा नोंदवावा त्यावर मला भाष्य करायचे नाही. परंतु एक गोष्ट निश्‍चित आहे, की ही जी घटना घडली, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. त्या वेळेला चौघे आरोपी ठार झाले आणि ही बाब देशभरात एक जल्लोष करणारी, लोकांना आनंद वाटणारी ठरली. यामागची जर लोकांची मानसिकता बघितली, तर ती मोठी चिंताजनक आहे. चिंताजनक एवढ्याकरता, की गुन्हेगारांना शासन होणं हे सर्वसामान्य लोकांना आवडल्याचे द्योतक आहे. परंतु त्याचबरोबर, सध्या गुन्हेगारांना लवकर शासन होत नाही, ही देखील लोकांच्या मनात असणारी सल त्यानिमित्ताने बाहेर प्रकर्षाने प्रकट झाली. आणि म्हणून हा वेकअप कॉल आहे. हैदराबादच्या या घटनेमध्ये लोकांनी जाहीररीत्या जल्लोष करणं, विशेषत: लोकप्रतिनिधींनी देखील याबद्दल आनंद प्रदर्शित करणं, याचाच अर्थ असा, की कुठे तरी आम्ही कमी पडतो आहोत. म्हणून लोकांचा जी सिस्टिम आहे या सिस्टिमवरचा विश्‍वास उडत चालला आहे. याचे हे निशाण आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, त्याबद्दल कोणालाही दु:ख होणार नाही, आनंदच होईल, त्यापैकी मी एकदेखील आहे; परंतु जी पद्धत लोकांनी अवलंबली आणि लोकांना अपेक्षित आहे, ही लोकशाहीला धोक्‍याची घंटा आहे.

हेही वाचा : ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन... पुन्हा येईन... 
माझ्या भूमिकेवर प्रश्‍न चिन्ह 

लोकांना असं वाटतं, की जे मला अजमल कसाबमध्ये बघायला मिळालं, प्रामुख्याने प्रश्‍न विचारला जात होता, की अजमल कसाबचा खटला कशा करता चालवता? त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असताना त्याला फाशी का दिला नाही? कसाबने गुन्ह्याची कबुली न्यायालयात दिली. कोर्टाने मला विचारलं, "तुम्हाला कसाबने दिलेला कबुली जबाब मान्य आहे का? मान्य असेल तर त्याला शिक्षा करतो.' त्यावर मी म्हटलं, "मला मान्य नाही.' त्यावर अनेक दिग्गज नामांकित वकिलांनी माझ्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला. निकम हा खटला कशाकरिता चालवतात, असं मला विचारलं जाऊ लागलं. तेव्हा माझ्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्या बिचारा पामरांना हे माहीत नव्हतं, की कसाबने काय कबुली जबाब दिला आहे. त्यात त्याने स्वत:चा बचाव कशारीतीने केला आहे, मयत साथीदाराविरुद्ध कशारीतीने दूषणं लावतोय, याचा विचार न करता सर्वसामान्यपणे जनता, एका टेंपररीली विचाराखाली वाहत जाते. हैदराबादच्या घटनेत नेमकं काय घडलं? फक्त मेले एवढंच माहिती झालं; पण त्याचे भावी दुष्परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार कोण करत नाही. अजमल कसाबच्या घटनेतही हेच झालं. जगाला कळू द्या, की आपली न्यायप्रणाली कशी उच्च आहे. हा खटला इन कॅमेरा चालवला असता तर लोकांना काहीच कळालं नसतं, म्हणून माझी ही भूमिका होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT