whatsapp group help for medical treatment
whatsapp group help for medical treatment 
पश्चिम महाराष्ट्र

केवळ शंभर रुपयांत होणार मोठ-मोठ्या आजारांवर उपचार  

सकाळ वृत्तसेवा

निपाणी - आरोग्यसंपदा चांगली राखण्यासाठी "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्‍युअर' असे म्हटले जाते. औषध-उपचारासाठी येणारा खर्च आता आवाक्‍यात राहिला नाही. घरातला माणूस आजारी पडला की घरादाराची परवड होते. जीव वाचविण्यासाठी दागिने, जमीनजुमला गहाण ठेवावा लागतो. त्यामुळे आजारच होऊ नये, अशी काळजी घेतली, तरच जीवघेण्या रोगांपासून बचाव करता येईल, अशी अवस्था आहे. यासाठी अनेक संस्था, संघटना गरिबांना याची झळ लागू नये, यासाठी धडपडताना दिसतात. निपाणीजवळच्या म्हसोबा हिटणी (ता. हुक्केरी) येथील काही तरुणांनी गावांत सुरू केलेली "हेल्पिंग हॅंड' ही शंभर रुपये मदतीसाठी संकल्पना तशीच अनोखी व उल्लेखनीय आहे. 

तणावाखाली असणाऱ्यांना येणारा हार्ट ऍटॅक, ब्रेन हॅमरेज, मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आणणारा, सर्वांना सुन्न करणाऱ्या घटना अनेकदा घडतात. घर-दार विकून उपचार करायचे किंवा आहे त्या स्थितीत रुग्ण सांभाळायचा, अशी विचित्र अवस्था कुटुंबीयांची होते. या परिस्थितीत म्हसोबा हिटणीचे पण नोकरीनिमित्त पुण्या-मुंबईत राहणारे तरुण व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी "हेल्पिंग हॅंड' व्यासपीठ उभे केले. त्यांनी 50-55 जणांचा व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केला. ग्रुपमधील प्रत्येकाने प्रत्येकी शंभर रुपये पेटीएमद्वारे "हेल्पिंग हॅंड' खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली. ही एकत्रित रक्कम नंतर रुग्णांच्या उपचारासाठी दिली. त्यातून रुग्णांच्या तपासण्या, काहींवर मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु झाले. रुग्णांच्या आजाराचे रेकॉर्डही तयार केले जाणार आहे. 

"हेल्पिंग हॅंड'ने यापूर्वी रक्तदान, आरोग्य तपासणीची सार्वजनिक शिबिरे, व्याख्याने घेतली आहेत. हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्याचा करण्याचा स्वयंसेवकांचा प्रयत्न आहे. पूर्वी शिबिरापुरती होणारी तपासणी आता विशेषतः ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया यांची दरमहा होणार आहे.

26 जानेवारीपासून मिळणार लाभ 
या नव्या उपक्रमामुळे नागरिकांचा गंभीर आजार होण्यापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची सुरवात 26 जानेवारीपासून करण्याचे निश्‍चित केले आहे. 
- प्रवीण पाटील, स्वयंसेवक, हेल्पिंग हॅंड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT