देवराष्ट्रे (सांगली) ः अमरापूर (ता. कडेगाव) येथे पाउस व वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झालेली झोपडी दोघा भगिनींनी पुन्हा उभारली. शिंगरवाडी (ता. पुसद, जि.यवतमाळ) येथील बंजारा समाजाची उसतोड टोळी थांबली होती. सोमवारी अचानक मध्यरात्री सोसाट्याचा वारा, वीजेसह पाउस पडू लागला. यावेळी टोळीतील दोघी एका झोपडीत होत्या. झोपडीवरील कागद वाऱ्याने उडून गेला. त्यामुळे या अस्मानी संकटाने दोघीही सैरभेर झाल्या. त्यांनी एका वस्तीवर जाऊन आसरा घेतला. रात्र कशीबशी घालवली.
अमरापूर येथे सकाळी आल्यावर पाहिलं तर झोपडी जमिनदोस्त झाली होती. सर्व वस्तू भिजून भांडीकुंडी शिवारात विखुरली होती. या संकटाने त्यांचे अवसान गळाले. पण या दोघींनी जिद्द न सोडता झोपडी उभारायचा केलेला निश्चय तडीस नेला. काजल व कोमल राठोड असे या भगिनींचे नाव. वय केवळ 14. ज्या वयात शिकायचे, खेळायचं, बागडायचं त्या वयात हातात कोयता आला. शिकायची आवड पण, परिस्थिती आडवी येते. मार्च महिन्यात राठोड कुटुंबावर दु:खद प्रसंग ओढवला.
त्यामुळे आई-वडिलांना गावी जावे लागले. इकडे उसतोड सुरुच होती. त्यात अचानक लॉकडाऊन झाल्याने आई-वडील गावीच अडकले. आई-वडिलांच्या आठवणीत दिवस कंठत असताना डोक्यावरचे छतच निसर्गाने हिरावून नेले. मोबाईल नसल्याने जन्मदात्यांचा संपर्कही होत नाही. उसतोडीचे कामही उरकले आहे. खाण्यापिण्याचे वांदे झाले असताना हा प्रसंग ओढवला.पण त्याचा धीरोदात्तपणे सामना करायला या दोघी कुठेही कमी पडल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.