Who is guilty in the Zilla Parishad report 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांचे दप्तर हरवले... चौकशीत कोणी नाही सापडले 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. दोन अहवालात एकूण आठ जण दोषी आढळले. तिसऱ्या अहवालामध्ये कोण-कोण दोषी आहे, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र, हा तिसरा अहवाल "दप्तर'च्या फेऱ्यात अडकल्याने तो रखडला आहे. 
अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने तीन पथके नेमली. 

जाणून घ्या : फेसबुक आलंय वयात...
 

तीन दोषी आढळले 
पहिल्या पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दुसऱ्या चौकशी अहवालात प्रथमदर्शनी एकूण पाच अधिकारी दोषी आढळून आले. त्यांच्यावर प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. 

दोषींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न 
पहिला व दुसरा अहवाल तयार होऊनही तिसरा अहवाल तयार होत नसल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. अनेकांनी या अहवालाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून त्यात नेमके कोण दोषी आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अहवाल सुरु असल्याचे प्रशासनाकडून उत्तर मिळत होते. मात्र हा तिसरा अहवाल राजूर व आणखी एका ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशी आहे. मात्र, या ग्रामपंचायतीचे दप्तर गायब असल्याने चौकशी समितीच्या हाती काय लागले याचा स्पष्ट उलगडा होत नाही. दप्तर गायब असल्याने संबंधित ग्रामसेवकावर गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यामुळे अहवालात आता काय उल्लेख करायचा असा प्रश्‍न या समितीला पडलेला असल्यानेच हाच अहवाल रखडलेला आहे. 


कारवाईतून कोणालाही वगळू नका 
तीनपैकी दोन चौकशी समित्यांचे अहवाल तयार आहेत. त्यातील एका चौकशीतील तीन जणांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे इतर दोन्ही चौकशी अहवालातून कोणालाही वगळू नये, व कोणालाही सहानुभूती प्रशासनाने दाखवू नये, अशी मागणी जोर धरत आहेत. 

नातेवाईक कोण कोणाचा? 
चौकशी अहवालातून नातेवाईक वाचविण्यासाठी काहींची धडपड चालू आहे. ही धडपड प्रशासनाने यशस्वी होऊ न देता व नातेगोत्याचा विचार न करता सरसकट कारवाई करून कारभारातील पारदर्शकता स्पष्ट करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य सुषमा दराडे यांनी केलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभाराची गेल्या दहा वर्षांची चौकशी करावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT