keshari card.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रेशन दुकानदारांवर ऊसनवारीची वेळ का आली? वाचा

विष्णू मोहिते

सांगली- राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केशरी रेशनकार्डवर दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला. सन 2007 नंतर तब्बल 13 वर्षांनी त्यांना धान्य मिळतेय. ही बाब चांगली आहे. मात्र यासाठी जिल्ह्यातील 1356 आणि राज्यातील 55 हजार धान्य दुकानदारांना धान्य भरण्यासाठी मोठी रक्कम जमा करण्यासाठी भांडवलदारांकडून उसनवारीची वेळ आलेली आहे.

सांगली जिल्ह्यात नियमित धान्यांसाठी 1.73 कोटी भांडवलाची गरज असते. केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी गहू 8 रुपये, तांदूळ 12 रुपये किलोप्रमाणे किमान भांडवल 4.07 कोटी रुपयांची गरज आहे. किमान पावणेतीन ते तीनपट भांडवलासाठी दुकानदार भांडवलदारांकडे उसनवारी करतानाचे चित्र आहे. 15 ते 20 दिवसांनी घातलेले भांडवल त्यांना परत मिळणार आहे. याचा विचार करून विक्रीनंतर रक्कम भरून घेण्याची मागणी आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. यामध्ये एपीएल केशरी रेशन कार्डधारकांसाठी जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीमध्ये येत नाहीत, ज्यांना दरमहा धान्य मिळत नाही, अशांसाठी राज्यशासनाने योजना सुरू केली आहे. मे आणि जून महिन्यामध्ये केशरी कार्डधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने 10 लाख 18 हजार 187 लोकांना धान्याचे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे या कार्डधारकांना प्रथमच धान्य मिळत आहे. ही केशरी रेशनकार्ड धारकांसाठी सुखावह बातमी असली तरी दुकानदारांना कोषागारात रक्कम भरण्यापूर्वी कसरत करावी लागली आहे. नेहमीच्या भांडवलापेक्षा तीनपट रक्कम भरावी लागणार आहे. रकमेची तजवीज करून भरल्यानंतर पाच-सहा दिवसांनी धान्य आणि धान्य विकून दुकानदारांच्या हातात भांडवल जमा करण्यासाठी किमान 15-20 दिवसांचा कालावधी जाणार आहे. तो पर्यंत भांडवलदारांच्या भांडवल कसे वापरायचे, याही विवंचनेत दुकानदार आहेत. 


नियमित कार्डधारकांना 3 लाख 75 हजार 200 कुटुंबांना स्वस्त धान्याचे 95.54 टक्के धान्याचे वाटप पूर्ण झाले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना या दोन योजनांमधून सुमारे 4393 टन गहू, 2847 टन तांदूळ वाटला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या 9200 टन तांदळापैकी सुमारे 90 टक्के तांदळाचे वाटप झाले. मात्र तो मोफत असल्यामुळे भांडवलाचा विषय आला नाही. अन्यथा तो जर विकत असते तर किमान पाच पटीने भांडवल गोळा करायची वेळ दुकानदारांवर आली असती. राज्य सरकारने केशरी कार्डसाठी जाहीर केलेल्या प्रतीव्यक्ती गहू 3 किलो 8 रुपयांनी आणि तांदूळ 2 किलो 12 रुपयांनी विक्री होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 1356 दुकानदारांना 4 कोटी 18 लाखांवर भांडवल आगावू कोषागारात चलनाने भरावे लागलेले आहेत. 

केशरीसाठी 75 टक्के कोटा... 

पुरवठा विभागाने मागणीच्या 75 टक्के धान्याच दुकानदारांना दिलेले आहे. सर्व कार्डधारकांनी धान्याची मागणी केली तर पुन्हा धान्य उचलायची वेळ दुकानदारांवर होणार आहे. नियमित धान्यापेक्षा दोनदा जादा धान्य मिळाल्यामुळे दुकानदारांना मानही वर करायला संधी मिळत नाही. शिवाय धान्य साठवण्यासाठी जागेचा प्रश्‍न अनेक ठिकाणी गंभीर आहे. 
 

"रेशन दुकानदारांपुढे भांडवलाचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. कोषागारात चलनाने आठवडाभर अगोदर रक्कम भरावी लागते. राज्य सरकारने विशेष सलवत म्हणून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धान्य वाटते आहे. तसाच विचार दुकानदारांबाबत सरकारने करावा. अगोदर भांडवल भरून घेण्याऐवजी विक्रीनंतर तातडीने रक्कम भरून घेण्यास आमची हरकत नाही.' 
एक दुकानदार, सांगली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT