Wiii Shivsena give ministry to MLA Prakash Abitkar
Wiii Shivsena give ministry to MLA Prakash Abitkar 
पश्चिम महाराष्ट्र

वादळात दिवा लावणाऱ्या 'या' आमदाराची दखल शिवसेना घेणार ? 

सदानंद पाटील

कोल्हापूर - सोबत नाव घेण्यासारखा मोठा नेता नाही आणि सभा गाजवणारा वक्‍ता नाही, अशा परिस्थितही डोंगर - दऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी - भुदरगड मतदार संघात शिवसेनेच्या आमदार प्रकाश आबीटकर यांनी दुसऱ्यांदा मैदान मारले. विरोधात दिग्गज आणि अनुभवी नेत्यांची फळी असताना दुसरीकडे पावणे पाच वर्षे सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांनी साथ सोडली. तरीही न डगमगता आबीटकर यांनी सर्वसामान्य लोकांशी जोडलेली नाळ आणि मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात केलेल्या विकास कामाच्या जोरावर विधानसभेत दुसऱ्यांदा धडक दिली. वादळात दिवा लावणाऱ्या आबिटकरांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची कृपादृष्टी आता तरी पडावी, अशी अपेक्षा मतदार संघातून व्यक्‍त होत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिले जात होते. सहा आमदार आणि दोन खासदार असलेल्या शिवसेनाचा चांगलाच बोलबाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत झाले. सहा पैकी पाच आमदारांना मतदारांनी घरात बसवले. आघाडीच्या प्रचंड रेट्यातही राधानगरी - भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी वादळात दिवा लावला आहे. मागील पाच वर्षात आबीटकर यांनी गावोगावी आपले नेटवर्क उभे केले. गाव लहान असो की मोठे, याठिकाणी स्वत:चा गट उभा करण्याचे काम त्यांनी केले. 

आबीटकरांच्या पहिल्या आमदारकीला माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव चागले, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, उदयसिंह पाटील कौलवकर, सुधाकर साळोखे, जयसिंग खामकर, एल. एस. पाटील, मधुकर देसाई, भरत पाटील, अभिजित तायशेटे आदी मंडळींनी हातभार लावला. याची परतफेड आबिटकर यांनी गोकुळ, जिल्हा परिषद, साखर कारखाना निवडणुकांमध्ये केली. मात्र विविध कारणांनी पहिल्या निवडणुकीत मदतीला आलेले अनेक नेते यावेळी मात्र विरोधात गेले. या नेत्यांनी के. पी. पाटील यांना पाठबळ दिल्याने राष्ट्रवादीला विजयाला फाजील आत्मविश्‍वास आला. तोच के.पी. यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. तर भुदरगडमधून बी. एस. देसाई, कल्याणराव निकम, नंदकुमार ढेंगे तर राधानगरीतून अभिजित तायेशेटे, अरुण जाधव यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेत आबीटकरांना विजयाचा गुलाल लावला. 

सेना आता तरी गांभीर्याने घेणार का? 
शिवसेनेला स्थापनेनंतर पहिल्यांदाच गत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. दहा पैकी पक्षाचे सहा आमदार आणि दोन खासदार निवडून आले. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके तसेच डॉ. सुजित मिणचेकर हे तर दुसऱ्यांदा निवडून आले होते. यातील कोणाला तरी मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सेना नेतृत्वाने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. सेनेने जिल्ह्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका या निवडणुकीत बसला. सहाचे संख्याबळ आता एकवर आले आहे. आगामी काळात गोकुळ, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यात जर यश मिळवायचे असेल तर आमदार आबीटकर यांना मंत्री करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. 

तायशेटे किंगमेकर 
गतवेळी आमदार आबीटकर यांना राधानगरीने साथ दिली. जे नेते गतवेळी सोबत राहिले त्यातील बहुतांश नेत्यांनी एकतर विरोधात काम करणे पसंत केले किंवा ते स्वतंत्र लढले. मात्र यावेळीही जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे हे आबिटकर यांच्या मदतीला धावले. लोकसभेला प्रा.संजय मंडलिक यांच्यासाठी ज्याप्रमाणे तायशेटे यांनी निर्णायक रॅली काढली तशीच रॅली आबिटकर यांच्यासाठी काढत, विजयाचा मार्ग सुकर केला. 

अर्जुनाने लक्ष्य भेदले 
विधानसभेला प्रकाश आबीटकर यांनी जरी मैदान मारले असले तरी या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचे बंधू प्रा. अर्जुन आबीटकर यांच्याकडे पाहिले जाते. आबिटकर गटाचा खरा थिंक टॅंक अशी त्यांची ख्याती आहे. गेली 15 ते 20 वर्षे युवा संस्थेच्या माध्यमातून गावं आणि वाडी-वस्तीवर असलेला त्यांचा संपर्क आणि छोट्या-मोठया कार्यकर्त्यांना घेवून लावलेल्या जोडण्या यामुळेचे विधानसभेचे लक्ष भेदण्यात यश मिळाले आहे. तोंडात साखर- डोक्‍यावर बर्फ याबरोबरच एखाद्याचा करेक्‍ट कार्यक्रम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT