पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणारे तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.

जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत असून, शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. काही वस्तू उदा: पाणी, आगपेटी, मेणबत्ती, इंधन, पालेभाज्या, दुध इत्यादी वस्तू एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे. जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणारे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

याबाबत वजनमापे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.  पूर परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, असे भासवून जादा दराने वस्तूंची विक्री करणे तसेच अशा स्वरुपाचे संदेश सोशल मीडियावर टाकून अफवा फसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत पोलिस विभागही दक्ष असून, पूरग्रस्तांसाठीच्या मदतकार्य तसेच तक्रारींसाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416 आणि 1077 असा आहे. जनतेने आपल्या तक्रारी नियंत्रण कक्षाकडे कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबतही प्रशासन दक्ष असून, आज सकाळी सात हजार गॅस सिलिंडर शिरोली नाका येथे आले असून, ती सिलेंडर व उर्वरित टँकर शहरात आणण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत असल्याने गॅस पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पूरग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील इमारतींमध्ये पाणी आले आहे, अशा ठिकाणी चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबरोबरच सोशल मीडियातून काही जण अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT