Without you, winter is not over 
पश्चिम महाराष्ट्र

आलीस तू... फुलले ऋतू... 

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः "थंडी' तुझ्या विना हिवाळा नकोसा झाला होता. ढगांच्या जाडजूड चादरीत तू दडून बसलीस. चारपैकी तीन महिने सरले. तू येशील की नाही, सर्वांना चिंता पडली. तुझ्या विना हिवाळा म्हणजे प्राणावाचून कुडी, पाण्याविना मासा. उशिरा का होईना, अचानक आज भल्या पहाटेच तू अवतरलीस. गारेगार झोंबणारे वारे वाहू लागले तसे सृष्टीत चैतन्य संचारले. पहाटेची हलक्‍या धुक्‍याची मुलायम दुलई दूर झाली. सूर्याच्या कोवळ्या तांबूस किरणांनी अवघे आसमंत झगमगले. गारवा वाढला, वाड्या-वस्त्यांवर आज पहिल्यांदा तुझ्या स्वागतासाठी शेकोट्या पेटल्या. 

आकाशात त्याचा धूर न जाता डोक्‍यावर रेंगाळू लागला. बाटलीतले खोबरेल तेल थिजले. आडोशाला ठेवलेले उबदार कपडे लपेटून बालगोपाळ शाळेला निघाले. हिरव्यागार पिकांवर दवबिंदू चमचमू लागले. "आलीस तू, सजले ऋतू' अशा दिमाखात तुझे आगमन झाले. तू मागे राहिल्याने यंदाचा हिवाळा उदासवाणा झाला होता. आकाशात दाटणाऱ्या मळभात तू दडून बसलीस. मळभात झाकोळलेला सूर्य उदासीनता आणखी वाढवायचा. अधूनमधून पडणारे अवकाळी पावसाचे थेंब शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढवायचे. तीन महिने सरले तरी तू येण्याचे नाव घेत नव्हती. खरीप अतिपावसाने नेले. आता तुझ्या दडी मारण्यामुळे रब्बी हातचे जाणार का? अशी चिंता बळिराजाला सतावू लागली. कीटकनाशकांचा खर्च त्याचा खिसा रिकामा करीत होता. 

डिसेंबर महिन्यात तू एरवी जोमात असतेस. यंदा तुझा पत्ता नसल्याने गव्हाची वाढ खुंटली. वितभर असतानाच ओंबी फेकतो की काय शेतकऱ्याला भीती वाटू लागली. एरवी पहाटपासून हरभरा पिकावर दवामुळे तांब अवतरते. गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके तुझी वाट पाहून हिरमुसली. आकाशाकडे झेपण्याची शक्ती हरवून बसले. आज तू आलीस तशी ही पिके बऱ्याच दिवसांनंतर दवात न्हाली. कोवळ्या उन्हात सप्तरंगी रत्नांसारखे दिसणारे दवबिंदू तुझ्या येण्याची वर्दी देऊ लागले. अद्याप हुडहुडी भरायची आहे. दिवसभराचे कोवळे ऊन आणि उत्साह याचा अनुभव यायचा आहे. त्यासाठी तुझ्या मुक्कामाची गरज आहे. थंडीविना हिवाळा नको वाटत होता. आजपासून हवाहवासा वाटू लागला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंचा 'फर्स्ट क्लास' प्रवास! लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतही मिळाली विंडो सीट, मनसेच्या ७ जणांना बसायलाही जागा

MNS- MVA Morcha: मग लोकसभेत ३१ खासदारांनी मतचोरी केली होती का? मविआ-ठाकरेंच्या मोर्चावर भाजपचा सवाल

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांवर 'डिजिटल' नजर! नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने विकसित केली ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली

मोठी बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २,५४० कोटींची मदत; रब्बी हंगामासाठी १,७६५ कोटींचे पॅकेज जाहीर

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची समझोता बैठक मुंबईत सुरु

SCROLL FOR NEXT