woman with boy get abducted then raped in satara  
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात मुलासह अपहरण करून महिलेवर बलात्कार

सकाळ वृत्तसंस्था

कोरेगावः मुलासह अपहरण करून कोरेगाव तालुक्यातील महिलेवर साताऱ्यात बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिल्यानंतर सांगली जिल्ह्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे, रोहित रमेश (रा. हकनूर ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे.

या संदर्भातील फिर्यादीत पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित महिला मुलासह कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. रस्त्याने चालताना कोणी तरी पाठलाग करत असल्यासारखे वाटत होते; परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. दरम्यान, रिक्षा स्टॉपजवळ गेल्यावर रस्त्यावर उभे राहून त्यांनी पतीला फोन लावला; परंतु फोन लागला नाही. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कोणा तरी नाकाला रुमाल लावल्यामुळे पीडितेला गरगरल्यासारखे झाले. त्यानंतर पुढे काय झाले हे त्यांना समजले नाही.

त्यानंतर जाग आली तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. मुलगा बेडवर झोपला होता. बेशुध्दावस्थेत असताना संशयिताने मुलासह पीडितेला अपहरण करुन साताऱ्यातील लॉजवर नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. ‘हा प्रकार कोणाला सांगितल्यास याद राख,’ अशी धमकी देऊन पीडितेचे तोंड रुमालाने बांधले.

त्यानंतर सकाळी आठ वाजता संशयिताने पीडितेला तिच्या मुलासह सातारा बस स्थानकावर नेऊन तिकीट काढून बसमध्ये बलवून दिले. घरी आल्यानंतर आधी मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी गेल्याचे सांगितले; परंतु घरच्यांनी विश्वासात घेतल्यानंतर सर्व हकिकत सांगितली. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT