पश्चिम महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून पोलिस युवतीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून पोलिस युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका पोलिसावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय सतीश कांबळे (रा. भरतगाव, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.

याबाबत संबंधित युवतीने फिर्याद दिली आहे. संबंधित युवतीही पोलिस दलात कार्यरत असून, 2018 मध्ये अक्षय जिल्हा पोलिस दलात भरती झाल्यावर त्याची संबंधित युवतीशी ओळख झाली. त्यानंतर तो पोलिस प्रशिक्षणासाठी अकोला येथे गेला. तेव्हाही तो तिच्याशी फोनवर बोलायचा, तसेच तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. 2019 मध्ये प्रशिक्षण संपवून अक्षय मुख्यालयात रुजू झाला. त्या वेळी संबंधित युवतीने साताऱ्यात भाड्याने खोली घेतली होती. तेथेही तो वारंवार जात होता. या वेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मुख्याध्यापकास सक्तमजुरी 

मे 2019 मध्ये त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. त्या वेळी त्याने 50 हजार रुपये मागितले. तो लग्न करणार असल्याने माझ्याकडील 35 हजार रुपये व दागिने गहाण ठेवून आलेले 15 असे 50 हजार रुपये अक्षयचा भाऊ व आईकडे दिले. त्यानंतर मी वारंवार अक्षयला लग्नाबाबत विचारले. त्या वेळी घरातील लोकांना विचारून ठरवू, असे तो सांगायचा.

काही दिवसांनी मी 50 हजार रुपये परत देण्याबाबत, तसेच लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. त्या वेळी माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशीच लग्न करणार असे त्याने सांगितले. त्यानंतर तो लग्न करणार नसल्याची खात्री झाली. त्यामुळे कुटुंबीयांकडे विचारणा करून त्याच्याविरुद्ध फिर्याद देत असल्याचे संबंधित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अक्षयवर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Video : मोदी-शहांना जनता माफ करणार नाही ः जयंत पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT