पश्चिम महाराष्ट्र

कुमठेतील महिलेचा डेंगीने मृत्यू

सकाळवृत्तसेवा

तासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे डेंगीसदृश तापाने एका महिलेचा मृत्यू झाला. सुनीता अरुणकुमार माळी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून आणखी चार जणांना डेंगीची लागण झाली आहे.

दरम्यान, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्‍यात अन्य काही गावांमध्ये डेंगीचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कुमठे येथे गेल्या काही दिवसांपासून डेंगीसदृश तापाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. सुनीता माळी (वय ३१) यांच्यावर गेली काही दिवस मिरज मिशन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. दरम्यान, काल रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्याशिवाय अन्य चार जणावर डेंगीसदृश तापासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी सुनीता माळी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून तथापि नक्की डेंगीनेच मृत्यू झाला का, याबाबत अद्याप प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. उपचार घेत असलेल्या अन्य चार रुग्णावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून ते नक्की कोणत्या तापाने आजारी पडले आहेत, हे सांगू शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

पथकांमार्फत सर्व्हे सुरू 
दरम्यान, चार पथकांमार्फत गावातील सर्व्हे सुरू असून १८२ घरांची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्‍यात काही गावांमध्ये अशा तापाचे रुग्ण वाढू लागले असून हिवताप विभाग नक्की करतो काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT