पश्चिम महाराष्ट्र

पगारासाठी ते चढले मोबाईलच्या टॉवरवर अन्....

सकाळ वृत्तसेवा

सांगली - आठ महिन्यांच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरवर चार कामगारांनी शोले स्टाईलने आंदोलन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पगार देण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे परिसरातील मोबाईल रेंज नसल्याने मोबाईलधारकांची तारांबळ उडाली.

चार कर्मचारी मोबाईल टॉवरवरच्या टोकावर चढले

एका खासगी मोबाईल कंपनीकडे ६० कर्मचारी आहे. त्यातील २० कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यासंदर्भात पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आज २० कर्मचाऱ्यांपैकी चार कर्मचारी मोबाईल टॉवरवरच्या टोकावर चढून आंदोलन केले. पाठोपाठ आंदोलनात एकूण २० कर्मचारी सहभागी झाले. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. आंदोलनस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आरटीएसमध्ये समाविष्ट झाल्यापासून या कामगारांना पगार देण्यात आला नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आंदोलकांशी बोलणी केली. मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी तातडीने सांगलीत दाखल झाले. यावेळी आंदोलकांची भेट घेऊन उद्या (ता. १३) दोन महिन्यांचा पगार देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलक खाली उतरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT