Workload on a single engineer! 
पश्चिम महाराष्ट्र

एकाच अभियंत्यावर दिवाबत्तीचा भार!

दौलत झावरे

नगर ः जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील इलेक्‍ट्रिक शाखा अभियंत्याचे दोनपैकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे एकाच शाखा अभियंत्याच्या खांद्यावर चौदा तालुक्‍यांचा भार आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रिकची कामे सध्या कासव गतीने सुरू आहेत. 

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेमधील विजेची कामे करताना इलेक्‍ट्रिक शाखा अभियंत्यांकडून मंजुरी घ्यावी लागते. त्यांची मंजुरी मिळाल्याशिवाय कामे होत नाहीत. जिल्ह्यात सुमारे एक कोटीची कामे जिल्ह्यात होत असतात. एकच शाखा अभियंता असल्यामुळे जिल्ह्याचा विचार करता त्यांच्या कामाला मर्यादा येत असल्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणची कामे निघाल्यानंतर त्यातील नेमक्‍या कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, याचे नियोजन करून पुढील कामे एकट्याला करावी लागत आहेत. त्यामुळे विजेची कामे जिल्हा परिषदेकडून सध्या धीम्या गतीने सुरू आहेत. 

जिल्हा परिषदेच्या उत्तर व दक्षिण बांधकाम विभागामध्ये एकूण 103 पदे मंजूर असून, त्यापैकी फक्त 84 पदे भरण्यात आली आहेत. एकूण 15 पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपकार्यकारी अभियंता व उपअभियंता असे एकूण पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्याबरोबरच शाखा अभियंत्यांचीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाचा कारभार अडखळत सुरू आहे. पदे रिक्त असल्याने त्यातच काही शाखा अभियंता-उपअभियंता कामानिमित्ताने रजेवर गेल्यानंतर त्यांच्या कामाचा भार इतरांच्या खांद्यावर जात असल्यामुळे बांधकाम विभागातील कामांचा वेग मंदावत असल्याचे दिसून येत आहे. 

किलोमीटरच्या  मर्यादा ओलांडल्या 

इतर शाखा अभियंत्यांना 40 किलोमीटरच्या आतच काम असते. मात्र, इलेक्‍ट्रिक शाखा अभियंत्याला जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. प्रत्येक ठिकाणी भेट देऊन तेथील पाहणी करूनच इलेक्‍ट्रिकची कामे मंजूर करावी लागतात. त्यानंतर काम सुरू असताना व बिल मंजूर करताना प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. त्यानंतरच बिले मंजूर होतात. 

एक पद रिक्त 
इलेक्‍ट्रिक शाखा अभियंत्याची दोन पदे असून, त्यातील एक पद रिक्त आहे. एकाच शाखा अभियंत्यांकडून जिल्ह्यातील कामे करून घेतली जात आहेत. 
- अर्जुन आंधळे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT