पश्चिम महाराष्ट्र

अहो आश्चर्यम...! बोटे मनगटाला टेकविण्याचा असाही विक्रम

विजयकुमार सोनवणे

 
सोलापूर ः हाताची बोटे मागच्या बाजूला वाकवून मनगटावर टेकवणे तेही एका मिनिटांत 45 वेळा हे शक्‍य आहे का, असे विचारले तर अनेकांचे नकारार्थीच उत्तर येईल. मात्र सोलापुरात चैतन्य गणेश चन्ना या विद्यार्थ्याने हे साध्य केले असून, त्याची दखल एक्‍स्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने घेतली आहे आणि तसे प्रमाणपत्रही त्याला दिले आहे. 

लहानपणापासूनच आहे सवय
येथील रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या चैतन्य चन्ना याने एका मिनिटात 45 वेळा आपली बोटं मागच्या बाजूला वाकून हाताला स्पर्श करून एक्सलूझिव वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे.  त्याचे शरीर लवचिक असून याचे शरीर लवचिक असून त्याला लहानपणापासुन आपली लवचिक बोटं हाताच्या मागच्या बाजूला वाकवून स्पर्श करण्याची सवय होती. तो येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये सहावीत शिकत आहे. 

एका मिनिटांत 45 ते 50 वेळा करतोय स्पर्श
आपले एक बोट मागच्या बाजूला वाकत नाही मात्र चैतन्य चे चारही बोटं मागच्या बाजूला वाकतात. तसेच ते हाताला स्पर्श ही करतात आणि विशेष म्हणजे एकदा दोनदा नव्हे तर एका मिनिटांत 45 ते 50 वेळा करतो. हे पाहून त्याचे वडील प्रा. गणेश चन्ना यांनी संकेतस्थळावर अधिक माहिती घेतली. 

चला पाहूया चैतन्यचा विक्रम (VIDEO)

रेकॅार्डसाठी व्हिडीअो पाठविला बरेलीला
बरेलीमध्ये एक्‍स्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड ही संस्था आहे. त्या संस्थेकडे प्रा. चन्ना यांनी चैतन्यचा व्हिडीअो पाठविला. संस्थेच्या प्रतिनिधींनी येऊन खात्री केली, साक्षीदारांच्या उपस्थितीत चैतन्य याचे प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानंतर त्याची कृती जागतिक विक्रमासाठी योग्य असल्याचा अभिप्राय देऊन तसे प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र व पदक असे निवडीचे स्वरुप आहे. महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Metro: आता गर्दीला रामराम! मेट्रो प्रवाशांसाठी भूमिगत वॉकवेची भन्नाट योजना, नवीन आठ प्रस्तावांना मंजुरी

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान थोड्याच वेळात संबोधित करणार, कारण काय?

SCROLL FOR NEXT