पश्चिम महाराष्ट्र

#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा

सुधाकर काशिद

कोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून गेली दहा वर्षे सातत्याने पाण्याचा लोट वाहतो. यावर एक जागरुक शेतकरी दहा वर्षे पाटबंधारे विभागाशी झुंजतो आहे. 

पनोरी (ता. राधानगरी) येथील नंदकिशोर सूर्यवंशी यांची धडपड थेट मंत्रालयापर्यंत सुरू आहे. रोज डोळ्यांदेखत वाहून जाणाऱ्या पाण्याचा लोट साऱ्या जगाला दिसतो. तो पाटबंधारे खात्याच्या एकाही अधिकाऱ्याला का दिसत नाही, हा त्याचा सवाल आहे. पाण्याचा वाहून जाणारा हा लोट थांबवायचा म्हटलं तर चार-पाच दिवसांत पूर्ण होणारे हे काम आहे. पण, दहा वर्षांत एक फूटभरही काम न झाल्याने अर्ज विनंत्यांचा ढीगच्या ढीग त्यांच्या फायलीत पडून आहे.

काळम्मावाडी धरणाच्या अलीकडे पनोरी हेळेवाडी रस्ता आहे. या रस्त्यावरून काळम्मावाडी धरणाचा डावा कालवा गेला. तेथे या कालव्याचे गेटही आहे. कालव्याचे अस्तरीकरण झाले. शेतीला पाणीपुरवठा करीत हा कालवा पुढे जातो. पण, सुरवातीलाच पनोरीजवळ कालव्याला अंतर्गत भगदाड पडल्याने पाण्याचा लोट खळखळाट करीत बाहेर पडतो. हे पाणी आसपासच्या शेतीत पसरून ती शेती खराब झाली आहे. शेती खराब होणे हा भाग वेगळा, पण रोज पाण्याचा लोट विनाकारण वाहत जात आहे. रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. याची या परिसरातील शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे. 

एकीकडे पाणी वाचवा, पाण्याचा थेंब-थेंब वाचवा असे आवाहन सरकार करते. पण, पाटबंधारे हा सरकारचाच एक विभाग आणि या विभागाला पाणी वाचविण्याचे महत्त्व कोण समजावून सांगणार हा या परिसरातल्या शेतकऱ्यांसमोरचा प्रश्‍न आहे. 

काळम्मावाडी धरणासाठी या भागातल्या शेतकऱ्यांचे योगदान आहे. धरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. पण, पाणीगळतीमुळे तेवढेच नुकसान झाले आहे. गेली दहा वर्षे कालव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याकडे आम्ही लक्ष वेधले. रोज डोळ्यांदेखत वाहून जाणारे पाणी पाहून मन अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेतून आम्ही पाण्याची गळती कमी व्हावी म्हणून धडपडतो. प्रतिसाद शून्य आहे. पण, आमची पाणी वाचविण्याची धडपड सुरूच राहणार आहे.
- नंदकिशोर सूर्यवंशी,
पनोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT