Writing a short date will have to be expensive marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

शॉर्ट तारीख लिहिणे पडेल महागात !

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - प्रत्येक ठिकाणी तारीख लिहून दस्तऐवज तयार केले जातात. शासकीय, खासगी असो की सार्वजनिक निवेदन अथवा पत्र हे तारीख लिहिल्याशिवाय अधिकृत होऊ शकत नाही. त्यामुळे व्यवहार आणि प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजात दिवसभरात अनेकदा तारखा लिहिण्याचा प्रसंग येतो. यंदा 2020 नवीन वर्षाला प्रारंभ झाला असून अजूनही काही नागरिक जुन्याच वर्षाप्रमाणे तारीख लिहित आहेत. त्यामुळे आता शॉर्ट तारीख लिहिणे महागात पडण्याची शक्यता आहे. त्याबाबत सोशल मीडियावर सावधानतेचे संदेश व्हायरल केले जात आहेत.

2020 वर्षात घ्यावी काळजी : सावधानतेचे संदेश व्हायरल

तारीख लघुरूपात (शॉर्टकट) लिहिणे प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेले आहे. मात्र बुधवार (ता. 1) पासून सुरू झालेल्या नवीन 2020 या वर्षात तारीख लिहिताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 'तारीख पे तारीख' होण्याची शक्यता आहे. तारीख पूर्ण स्वरूपात लिहावी लागेल. तारीख लिहिताना आपल्याला सवय झालेल्या 01/01/20 अशी लघु स्वरूपात लिहून चालणार नसून 01/01/2020 अशा पूर्ण स्वरूपात लिहावी लागणार आहे. कारण जर तारीख लघु स्वरूपात लिहिली असल्यास इसवी सनाच्या आकड्याचा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आकड्याचा विस्तार करणे सोपे होऊन हेराफेरी व फसवणूक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सवयीच्या झालेल्या 01/01/20 अशा लघु स्वरूपातील तारीख लिहिली तर यामध्ये कोणीही 01/01/2000 किंवा 01/2021 असा सोयीस्कर बदल करू शकतात. त्यामुळे 2020 वर्षात कोणतीही कागदपत्रे प्राप्त करताना किंवा स्वतः लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहिलेल्या तारीखेची काळजी घ्यावी लागणार आहे. ही समस्या यंदा वर्षभर राहण्याची शक्यता आहे.

सध्या सोशल मीडियातून याबाबतचे अनेक संदेश व्हायरल होत आहेत. सरत्या 2019 वर्षाला निरोप व नवीन 2020 वर्षाच्या स्वागताच्या संदेशाबरोबर तारीख लिहिण्याबाबतच्या सावधानतेचा संदेश मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'नवीन वर्षाला प्रारंभ झाला असून यापुढील काळात 2019 ऐवजी पूर्ण अंकात 2020 तारीख लिहावी लागणार आहे. त्याबाबत सर्वच विद्यार्थ्यांना सलग पंधरा दिवस प्रार्थनेच्या वेळी माहिती दिली जात आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडूनच दररोज पालकांना याबाबतची माहिती पुरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.'
-स्नेहा घाटगे,
प्राचार्या, मॉडर्न इंग्लिश स्कूल-निपाणी
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT