पश्चिम महाराष्ट्र

वाह रे कारभार..! इथे चोर सोडून संन्याशाला दिली जातेय शिक्षा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर :  थकबाकीदार मिळकतदाराने दिलेला धनादेश वेळेत जमा न केलेल्या कर्मचाऱ्यास शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्याचवेळी, धनादेश न भरण्याची सूचना ज्या वरिष्ठाने केली, त्याच्यावर मात्र काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, डिजीटल पद्धतीने आतापर्यंत सुमारे 19 कोटी रुपये कर जमा झाला. 

धनादेश भरण्यात संदिग्धता
सुमारे दीड लाखाची थकबाकी असलेल्या मिळकतदाराने वसुली पथकास 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यावर 25 डिसेंबर 2019 अशी तारीख होती. त्यामुळे हा धनादेश त्याच दिवशी महापालिकेच्या रोखपाल विभागात जमा होणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता हा धनादेश भरण्यात आला नाही. या प्रकरणी संबंधित कारकूनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे व या प्रकरणी खुलासा करण्यास सांगण्यास आले आहे. दरम्यान, संबंधित कारकूनाने धनादेश भरण्याची तयारी केली असता त्यांच्या एका वरिष्ठाने धनादेश तूर्त भरू नका म्हणून सांगितले होते, असा तोंडी खुलासा केला आहे, मात्र त्यास तसे लेखी देण्यास सांगितल्याचे कर संकलन अधिकारी प्रदीप थडसरे यांनी सांगितले. 

सकाळी आठपासून कर भरण्याची सोय 
महापालिकेतील नागरी सुविधा केंद्रात कर भरण्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ अशी वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना आता सकाळी आठपासून कर भरता येईल. या कालावधीत घनशाम टाक, आर.एम. तारवाले, निसार शेख व ए. एच. पाटील कामावर असतील, तसा आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी काढला आहे. या व्यवस्थेमुळे मिळकतदारांना कर भरणे सोईचे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT