The X Class exam will be held on time 
पश्चिम महाराष्ट्र

"दहावीची परिक्षा त्या तारखेलाच होणार, अफवांवर विश्वास ठेवू नये"

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर फिरू लागली आहे. मात्र शिक्षण खात्याने परीक्षेच्या वेळापत्रकात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नसून परीक्षा 27 मार्चपासूनच सुरू होईल असे स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने पहिली ते 6 वी पर्यंतच्या परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे पहिली ते 6 वीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून काही जणांनी दहावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे विध्यार्थी व शिक्षकांना मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तसेच प्रत्येकजण नवीन वेळापत्रकाबाबत विचारणा करून खात्री करून घेत होता. मात्र शिक्षण खात्याने वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नसून परीक्षा अगोदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रका प्रमाणेच पार पडणार असल्याचे कळविले आहे.

त्यामुळे काही जणांनी जाणीवपूर्वक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावर टाकून विध्यार्थामध्ये संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आले आहे. मात्र विध्यार्थानी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 27 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. शिक्षण खात्याने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली असून विध्यार्थी परीक्षेच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र काही जणांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात आहेत. यापासून विध्यार्थीनी दूर राहणे आवश्यक आहे. 

वेळापत्रकात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. अफवांकडे विध्यार्थीनी लक्ष देऊ नये. काही बदल झाल्यास शिक्षण खात्याकडून अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. शिक्षकांनी विध्यार्थांना मार्गदर्शन करावे. 
ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT