You need more than luck to succeed in affiliate business 
पश्चिम महाराष्ट्र

बंद-सुरूचा खेळ पुन्हा नको, तर हवे योग्य नियोजन 

जयसिंग कुंभार

आठ दिवसाची टाळेबंदी आजचा अखेरचा दिवस. तीन महिन्याच्या टाळेबंदीनंतर महिनाभरात जनजीवनला गती मिळत असताना पुन्हा एकदा ब्रेक लागला. आता यापुढे तरी बंद-सुरूचा खेळ पुन्हा होऊ नये यासाठी स्पष्ट दिशा घेऊन कृती केली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागात काही नियम घेऊन जगावे लागेल. नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद समन्वय हवा. आणखी काही काळे कोरोनासोबतचे सर्वांचे जगणे असणार आहे. त्यामुळे हे गृहित धरूनच शहराचे नियोजन कसे, असावे याबाबत व्यापारी-नागरिकांच्या चर्चेतून काही सूचना आल्या आहेत, त्याचा प्रशासनाने विचार करावा. 

प्रमुख पेठांबाबतचे धोरण 
सांगली शहरातील टिळक चौक ते राम मंदीर चौक आणि कर्नाळ रस्ता ते शंभर फुटी असा चार बिंदूना जोडणारा परिसर शहराचा मध्यवर्ती व्यापारी पेठांचा भाग आहे. गर्दी होते प्रामुख्याने याच भागात इथली गर्दी कमी करणारे सर्वंकष धोरण व्यापारी आणि स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून प्रशासनाने ठरवावे. त्यासाठी उपयुक्त ठरतील अशा काही सूचना. असेच नियोजन मिरज, कुपवाड किंवा जिल्ह्यातील अन्य शहरांच्या व्यापार पेठांबाबत करता येईल. 

सांगलीती गणपती पेठेतील दिवसभरातील माल भरणी-उतरणी बंद ठेवून सायंकाळी सातनंतर त्यासाठी मुभा दिल्यास रस्त्यावरील गर्दी कमी करता येईल. दिवसा या भागातील खासगी प्रवासी कार वाहने बंद ठेवावीत. गणपती पेठेत प्रवेशासाठी एकच मार्ग निश्‍चित केल्यास व्यापाराशिवायची या भागातील अनावश्‍यक गर्दी आपोआपच बंद होईल. 

टिळक चौक ते राम मंदिर चौक आणि पटेल चौक ते एसटी स्थानक या परिसरात प्रामुख्याने सांगलीतील व्यापार पेठा आहेत. या भागात फळ विक्रेते, हातगाडी वाले, भाजीपाला विक्रेते, मंडई अशा सर्वांना शहराच्या मध्यवर्ती चौक परिसरात किमान दोन अडीच महिन्यांसाठी व्यवसायास मनाई करावी. जेणेकरून या मध्यवर्ती परिसरातील दुकानांमध्ये खरेदी असेल तर उर्वरित शहरातून लोक या परिसरात येतील. मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यावरील खरेदीसाठीची गर्दी झटक्‍यात कमी होऊन गर्दीचे स्थलांतर होईल. या भागातील फक्त खासगी दुकानेच सुरु राहतील. या भागातील रहिवाशांची काही काळासाठी थोडी गैरसोय होईल इतकेच. 

फळ- भाजी बाजार विक्रेंदीत करा 
मध्यवर्ती भागातील सर्व आठवडा बाजार, भाजी मंडई तात्पुरती बंद ठेवून मिरज रस्ता, पेठ रस्ता, कर्नाळ रस्ता कोल्हापूर रस्ता या चौतर्फा रस्त्यांवर फिरत्या विक्रेत्यांनी व्यवसाय करावेत. तसेच कोल्हापूर रस्त्यावरील विष्णू अण्णा फळमार्केटमध्ये रोज सकाळी घाऊक भाजी-फळ खरेदीसाठी विक्रेत्यांची गर्दी होते. सध्या मार्केटजवळीलच निरंकारी मंडळाच्या जागेत भाजी विक्रेत्यांची खरेदी करून मार्केटमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. तथापि निरंकारी मंडळाच्या जागेतही गर्दी होत आहे. ती पांगवण्यासाठी काही होलसेल भाजी विक्रेत्यांना आदिसागर मंगल कार्यालयाजवळून हरिपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसण्याची सोय करता येईल. या रस्त्यावर सकाळी कोणतीच वाहतूक नसते. 

मार्केट यार्ड एकमार्गी करा 
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्ड आता शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या परिसरात दिवसभरातील गर्दी कमी करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने या परिसरातील किरकोळ विक्रीच्या दुकाने उघडण्याच्या वेळांवर निर्बंध आणले पाहिजेत. या परिसरातील व्यापाराशिवायची वाहतूक बंद करण्यासाठी एकमार्गी वाहतूक सक्तीने अंमलात आणली पाहिजे. उत्तरेकडील द्वारातून प्रवेश बंद केला पाहिजे. 

उपस्थितीचे धोरण ठरवा 
टाळेबंदी उठल्यापासून बहुतेक शासकीय कार्यालये आता पुर्ण कर्मचारी क्षमतेने सुरु आहेत. तेच अनेक शाळांबाबत आहे. शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने शाळांमध्ये येत आहेत. प्रत्येक कार्यालयात पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती राहील उर्वरित कर्मचारी घरातूनच काम करून योगदान देतील असे नियोजन कार्यालय प्रमुखांनी करावे असे रितसर आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पाहिजेत. 

निवांत जागांवर निर्बंध 
शहरातील सार्वजनिक ठिकाणी सायंकाळच्यावेळी गर्दी होत असते. कृष्णाघाट, हरिपूर घाट, शिवाजी स्टेडीयम, शहरातील बागांच्या परिसरात सायंकाळनंतर गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. ही ठिकाणे बंदच राहणार आहेत असा सक्त संदेश लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्याबरोबरच लोकांनी सोशल डिस्टन्सींग ठेवून नेहमीच वर्तन केले पाहिजे यासाठी सतत जागृती प्रबोधन ठेवा. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT