Farmer News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Farmer News : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल..; पुरात शेती उद्‌ध्वस्त झाली अन्...

Farmer News : घटनेची फिर्याद सचिन यांची पत्नी राणी यांनी अंकली पोलिस ठाण्यात (Ankali Police Station) दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सचिन आपली वडिलार्जित शेती कसून कुटुंब चालवत होते. शेती व इतर कारणासाठी त्याने सहकारी संस्थांमधून ८ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

मांजरी : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केल्याची घटना इंगळी (ता. चिक्कोडी) येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. सचिन राजू पाटील (वय ३२) रा. इंगळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सचिन आपली वडिलार्जित शेती कसून कुटुंब चालवत होते. शेती व इतर कारणासाठी त्याने सहकारी संस्थांमधून ८ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, अलीकडे कृष्णा नदीला आलेल्या पुरात संपूर्ण शेती उद्‌ध्वस्त झाल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची फिर्याद सचिन यांची पत्नी राणी यांनी अंकली पोलिस ठाण्यात (Ankali Police Station) दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास चालू ठेवला आहे. सचिन यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ व दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त तर या शहरांमध्ये दर वाढले! पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

Vidarbha Rain: विदर्भात आजही जोरदार पावसाचा यलो अलर्ट

Jan Vishwas Abhiyan: तक्रारी ऐकताच मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; नागरिकांच्या तक्रारींवर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची गदा

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT