A young man in Ghanegaon got stuck in the grinding machine and died
A young man in Ghanegaon got stuck in the grinding machine and died  
पश्चिम महाराष्ट्र

मळणी मशीनमध्ये अडकून घाणेगांव येथील तरुणाचा मृत्यू

कुलभूषण विभूते

वैराग - बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथे सोयाबीन पिकाची मळणी करीत असताना घाणेगांव ता. बार्शी येथील तरुणाचा मळणी मशीनमध्ये पाय अडकून दुर्दैवी मृत्यु झाला. त्याच्या मृत्युस निष्काळजीपणा, हयगय व दुर्लक्ष करून कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालकाच्या विरोधात वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना बुधवार दि. ३ ऑक्टोबर ला सायंकाळी मुंगशी (आर) शिवारात घडली. समाधान नानासाहेब राऊत (वय - 35), रा. घाणेगांव, ता. बार्शी असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत समाधान राऊत हा घाणेगांव येथील अशोक ज्योतीराम मोरे यांच्या मालकीच्या मळणी मशीनवर रोजंदारी मजूर म्हणून कामास होता. बुधवारी तो मुंगशी (आर) ता. बार्शी येथील शेतकरी राजेंद्र नारायण पाटील यांच्या शेतात सोयाबीन पिकाचे मळणी मशीनवर काम करीत होता. मशीनवर मळणीचे काम चालू असताना मशीनमध्ये अडकलेले पाला पाचोळ्याचे चोंदण पायाने काढत असताना मयत समाधानचा पाय मशीनमध्ये अडकून मोठा रक्तस्त्राव होत त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूस मशिन मालकाने मशिन बंद न करता निष्काळजीपणा, हयगयीने व अविचाराने दुर्लक्ष करून त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरला. अशी फिर्याद मयताचा भाऊ गुणवंत नानासाहेब राऊत यांनी वैराग पोलीसात दिली. या प्रकरणी पोलिसांनी  मळणी मशीन मालक अशोक ज्योतीराम मोरे, रा. घाणेगांव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत समाधान राऊत याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार असून तो घरातला कर्ता पुरूष होता. समाधानच्या मृत्यु बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर गुरुवारी 4 ऑक्टोंबर ला अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक माणिक जाधव हे करीत आहेत. मयत समाधानने सोयाबीन पिकांची रास करताना शेतकरी वर्गास मजुराची कमतरता बासू देत नव्हता. जोमाने कष्ट करण्यात तो तरबेज असा होता. दिवस, रात्रीपर्यंत तो मशिनवर काबाड कष्ट करत होता. अशा आठवणी त्याचे सहकारी सांगत शोकाकुल झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT