Siddeshwar 
पश्चिम महाराष्ट्र

सिद्धेश्‍वर यात्रेत वाढतोय तरुणांचा सहभाग 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रा अवघ्या काही दिवसांनी आहे. गेल्यावर्षीपासून सिद्धेश्‍वर यात्रेत सोहळ्यातील धार्मिक विधी वेळत व्हावेत त्याचबरोबर यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तरुण पिढी पुढाकार घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 
हेही वाचा - धक्कादायक...हमीपत्राशिवाय जाहीर होईना एमबीएचा निकाल

उन्हात ताटकळत थांबावे लागत

 20 ते 25 वर्षांपासून सिद्धेश्‍वर यात्रेत तैलाभिषेक, अक्षता सोहळा व धार्मिक विधी वेळेत होत नव्हते. अक्षता सोहळ्यास महाराष्ट्रसह विविध राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, धार्मिक विधी वेळत होत नसल्याने त्यांना उन्हात ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे पुढचे सर्व कार्यक्रम उशिरा होत. मात्र, गेल्यावर्षीपासून सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधी वेळत व्हावेत, येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी तरुणाई पुढाकार घेत आहे. 
हेही वाचा - माळशिरसच्या झेडपी सदस्यांची गुरूवारी सुनावणी 
यात्रेची माहितीसाठी तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय 
यात्रेतील सिद्धेश्‍वर महाराजांचे प्रतीक असलेला योगदंड प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांचा हातात होता. गेल्यावर्षी त्यांनी तो आपल्या पुढच्या पिढीच्या म्हणजेच सागर हिरेहब्बू यांच्या हातात सोपविला. सिद्धेश्‍वर यात्रेची माहिती सातासमुद्रापार पोचविण्यासाठी तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहण्यात येत आहे. सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर यात्रेची वैशिष्ट्य, यात्रा म्हणजे नेमके काय, धार्मिक विधी कसे पार पडतात, नंदीध्वज पकडून त्याचा सराव करण्यासाठी आज तरुण पिढी समोर येत आहे. यात्रेतील प्रत्येक उपक्रमात आज तरुणाई सहभाग घेऊन त्याचे महत्त्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

फेसबुक पेजवरून यात्रेचे महत्त्व
सोलापुरातील सिद्धेश्‍वर यात्रा सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रत्येकास माहिती आहे. मात्र, यात्रा सातासमुद्रापार पोचविण्यासाठी आम्ही फेसबुक पेजवरून यात्रेचे महत्त्व, यात्रा कशी असते आणि सिद्धेश्‍वर महाराजांनी लिहिलेल्या वचनांचा प्रचार व प्रसार आम्ही करत आहोत. 
- बसवराज बिराजदार, युवक 


सोशल मीडियावर त्याचा प्रचार व प्रसार
सिद्धेश्‍वर यात्रेची माहिती आणि महत्त्व समजवून सांगण्यासाठी आम्ही यंदा काही तरुण-तरुणी एकत्र येऊन शहरातील विविध महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी जाऊन माहिती सांगणे, सोशल मीडियावर त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे सध्या काम सुरू आहे. 
- श्रुती दर्गो पाटील  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT