A youth from Shirol wWorshiping soil of the chartapati Shivaji Maharaj's forts 
पश्चिम महाराष्ट्र

शिवभक्‍ताचा आगळा जिव्हाळा : शिवरायांच्या पायधुळीचे होतंय पूजन 

अजित कुलकर्णी

सांगली ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका ज्या-ज्या किल्ल्यांवर फडकली, अशा पन्नास किल्ल्यांवरील महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती एका शिवभक्त आपल्या घरच्या देव्हाऱ्यात ठेवून रोज पूजा करतो आहे. प्रवीण चुडमुंगे असं या शिवभक्‍तीचे नाव. शिरोळ (ता. कोल्हापूर) येथे घरी नित्यनियमाने गडांवरील मातीचे पूजन होते. मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात लिपिक पदावर ते काम करतात. 

चुडमुंगे यांना रानावनात भटकंतीचे वेड. शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडकोट मोहिम निघते. 1991 साली शिवप्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या प्रेरणेतून प्रवीण चुडमुंगे राजगड ते रायगडमार्गे शिवथरघळ मोहिमेसाठी गेले. स्वराज्याचा मूर्तिमंत व जाज्वल्य इतिहास प्रथमच गड, किल्ल्यांच्या रुपाने पाहताना ते भारावले. घनदाट जंगल, आकाशाशी स्पर्धा करणारे डोंगर, पर्वत, नद्या, ओढे, ओघळ अशा अनवट वाटा तुडवताना भारावलेल्या वातावरणात त्यांची जगणं शिवयम होऊन गेलं. 

या मोहिमेत गडाला वंदन करुन मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेली पायधूळ माथी लावली जाते. चिमूटभर माती जिभेवर सोडून घरी नेण्यासाठी बरोबर घेतली जाते. आजपर्यंत 27 मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या. येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात त्यांनी 10 वर्षे लिपिक म्हणून काम केले. सध्या ते मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 11 वर्षांपासून वरिष्ठ लिपिकपदी कार्यरत आहेत. 

या गडावरील माती 
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड, कोराईगड, वासोटा, अजिंक्‍यतारा, पुरंदरगड, सज्जनगड, सिंहगड, शिवनेरी, मच्छिंद्रगड, लोहगड, विसापूरगड, सुधागड, सरसगड, रांगणा, गगनगड, रायरेश्‍वर, रोहिडेश्‍वर, पारगड, मांढरगड, व्याघ्रगड, बहिरवगड, दातेगड, विजयदुर्ग, देवगड, कोकणदिवा, तैलबैल किल्ला, महानगड, वैराटगड, सामानगड, भुदरगड, वसंतगड, जरंडेश्‍वर, कल्याणगड, यवतेश्‍वर, भीमाशंकर यासह वढू बुद्रुक, शिवथरघळ, शनिवारवाडा, लालमहाल, पाचाड, धावडशी, मौनीमहाराज समाधी पाटगाव, जावळी अरण्य,मढेघाट,पावनखिंड, पडसाळी या ऐतिहासिक स्थळावरील मातीही त्यांच्या संग्रही आहे. 

एकतरी गुण आपल्या अंगी यावा, अशी धारणा

धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या रक्‍ताने गडावरील माती पावन झालेली असते. चिमूटभर पवित्र माती मुखात सोडताना मावळ्यांच्या रक्‍तातील किमान एकतरी गुण आपल्या अंगी यावा, अशी धारणा असते. मावळ्यांच्या पराक्रमाचे सदैव स्मरण राहावे, या हेतूने गडावरील माती गोळा करुन ती देव्हाऱ्यात पुजली जाते. आई मंगल, पत्नी अनिता, मुलगा शिवतेज, मुलगी दुर्गा हेही पुजेत सहभागी असतात. 

- प्रवीण चुडमुंगे, गडकोटावरील माती संग्राहक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT