Zika virus esakal
पश्चिम महाराष्ट्र

Zika Virus : सांगलीत आढळला झिकाचा रुग्ण; वृद्धेला लागण

सांगली शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रुग्णालय परिसरातच झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला. ८२ वर्षीय वृद्धेचा तपासणी अहवाल आला पॉझिटिव्ह.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - येथील शासकीय रुग्णालय परिसरातील ८२ वर्षीय वृद्धेला झिकाची लागण झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील २ हजार ४२ नागरिकांची एका दिवसात तपासणी केली; तर या परिसरातील सात गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रुग्णालय परिसरातच झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला. ८२ वर्षीय वृद्धेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासगी लॅबमध्ये याची तपासणी करण्यात आली होती. पुणे शहरापाठोपाठ सांगली शहरात झिका विषाणूची एन्ट्री झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली. या परिसरातील एक हजार घरांच्या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने दहा पथके नियुक्त केली आहेत.

पहिल्या दिवशी या पथकांच्या माध्यमातून सुमारे २ हजार ४२ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयास्पद असे कोणतेही रुग्ण आढळून आले नाहीत. झिकाचा गर्भवती महिलांना अधिक धोका आहे. त्यामुळे या परिसरातील सात गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हे नमुने पुणे येथील ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासह परिसरात औषध फवारणीदेखील सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो ३ प्रवास आता अधिक सोपा! फीडर बस सेवेचा शुभारंभ, दर किती अन् कुणाला फायदा होणार?

Anvay Dravid: द्रविडच्या धाकट्या लेकाची कर्णधारपदाला साजेशी खेळी, ६ चौकार अन् २ षटकारांसह फिफ्टी ठोकत कर्नाटकला मिळवून दिला विजय

Water Scarcity: दिवाळीपूर्वी खारघर तळोजामध्ये पाणीटंचाई, रहिवासीयांमध्ये नाराजी

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

अक्षय कुमारच्या अभिनयक्षेत्रातील गुरु असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन ; ८ ७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT