Lockdown
Lockdown 
पिंपरी-चिंचवड

दिघीमध्ये तीन दिवस लॉकडाऊन; पण पहिल्याच दिवशी...

संजय बेंडे

भोसरी : दिघीमध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग खंडीत करण्यासाठी दिघी ग्रामस्थांनी मंगळवारपासून (ता. ७) गुरुवारपर्यंत (ता. ९) सलग तीन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदला पहिल्याच दिवशी शंभर टक्के नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याने दिघीमध्ये सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता.

दिघीतील कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे दिघीमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता उद्रेक थांबविण्यासाठी दिघी ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी (ता. ४) सोशल माध्यमाद्वारे संपर्क साधत  त्याचप्रमाणे सोशल  डिस्टन्सिंगचे पालन करत काही मोजक्या ग्रामस्थांची सभा घेत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये ग्रामस्थांच्यावतीने दिघी मंगळवारपासून (ता. ७) गुरुवारपर्यंत (ता. ९) पर्यंत सलग तीन दिवस शंभर टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी ग्रामस्थांच्यावतीने दिघी पोलिस ठाण्यालाही निवेदन दिले. त्याचप्रमाणे सोशल माध्यमाद्वारे या बंदविषयी नागरकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली होती. यासाठी रिक्षाच्या माध्यमातून फेरी काढत ध्वनिक्षेपकाच्या सहाय्यानेही नागरिकांमध्ये या बंदविषयी जनजागृती केली होती.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बंदमध्ये दिघीतील सर्वच नागरिकांनी सहभाग घेतल्याने दिघीतील सर्वच व्यवहार बंद होते. या बंदमधून औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. त्यामुळे औषधांची दुकाने वगळता भाजी, किराणा मालासह इतर सर्वच वस्तू विक्रींची दुकाने बंद होती. परिसरात काही ठिकणी फक्त एटीएमची केंद्रे सुरू असलेली दिसत होती. मात्र, ती केंद्रेही ग्राहकांअभावी ओसाड दिसत होती. त्याचप्रमाणे दिघीतील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरीलही सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे दिघी परसरात सर्वच टिकाणी शुकशुकाट होता.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बंद असल्यामुळे नागरिकांनी गरजेच्या वस्तू अगोदरच विकत घेऊन ठेवल्या होत्या. मे महिन्यातही दिघीकरांनी असाच बंद पाळून यशस्वी केला होता. हा बंद यसस्वी करण्यासाठी दिघी पोलिसांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिघीत सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 च्या घरात आहे. सुरवातीला बोटावर मोजण्याइतकी कोरोनाग्रस्तांची संख्या दिघीत होती. मात्र लॅाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक घराच्या बाहेर पडल्याने कोरोग्रस्तांचा दिघीतील आकडा सतत वाढता आहे. दिघीला स्वतंत्र भाजी मंडई नाही. त्यामुळे दिघीकरांना भाजी-फळे आदींची गरज भागविण्यासाठी रस्त्यावर बसत असलेल्या भाजी-फळे विक्रेत्यांवर अवलंबून रहावे लागते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अरुंद रस्त्यावर भाजी-फळे विक्रेते बसत असल्याने खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. त्याचप्रमाणे विविध वस्तू विक्रीच्या दुकानातून खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन ग्राहकांद्वारे होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे काही दुकानदारांद्वारे शासनाने विक्रीसाठीचे घालून दिलेले नियमही पायदळी तुडवले जातात. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये आणि कोरोनाची शृखला खंडीत करण्यासाठी दिघी ग्रामस्थांनी घेतलेल्या शंभर टक्के बंदच्या निर्णयाचे परिसरैत स्वागत होत आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाला दिघीतून हद्दपार करण्याचा मानस काही तरुणांनी बोलून दाखविला. नागरिकांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी शासनाने सांगितलेल्या नियमाविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये सोशल माध्यमाद्वारे करण्यात येत आहे.

दिघीकरांचे कौतुक...

पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे रविवारी (ता. ५) जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, महापालिकेद्वारे शनिवारी (ता. ४) रात्री आठ वाजता जनता कर्फ्यू लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने भोसरी-दिघी परिसरात जनता कर्फ्यूचा फज्जा उडालेला दिसून आला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, दिघी ग्रामस्थांनी शनिवारीच सोशल डिस्टंगसिंगचे नियम पाळत सभा घेऊन दिघी शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची जनजागृती प्रत्येक नागरिकांमध्ये केल्याने या बंदविषयी नागरिकांमध्ये गोंधळ उडाला नाही आणि या बंदमध्ये नागरिकांनी शंभर टक्के सहभाग घेतला. त्यामुळे दिघी ग्रामस्थांचे भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरपरिसरात कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT