पिंपरी-चिंचवड

Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये 139 नवीन रुग्ण; 210 जणांना डिस्चार्ज मिळाला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात बुधवारी (ता. 23) 139 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 95 हजार 702 झाली. काल 210 जणांना डिस्चार्ज मिळाला. कालपर्यंत 92 हजार 293 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार 668 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील चार व बाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. कालपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 741 झाली आहे. तर, शहराबाहेरील 717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 700 रुग्ण उपचार घेत आहेत. 968 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 869 घरांना काल स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. 701 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

'कोविड प्रतिबंधक लससाठी नोंदणी करा' 
कोविड प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात सरकारी, महापालिका व खासगी आरोग्य व वैद्यकीय संस्थांमधील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. महापालिका व खासगी दवाखाने, रुग्णालये, सर्व वैद्यकीय, नर्सेस व औषध निर्मिती संघटनांशी संबंधितांनी महापालिकेच्या "स्मार्ट सारथी ऍप'वर दोन दिवसांत नावनोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT