MIT Cheque Sakal
पिंपरी-चिंचवड

एमआयटीकडून संत तुकाराम महाराज मंदिरासाठी दीड कोटी

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहातर्फे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर निर्मितीसाठी दिड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहातर्फे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर निर्मितीसाठी दिड कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

तळेगाव स्टेशन - माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहातर्फे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिर निर्मितीसाठी दिड कोटी रुपयांचा धनादेश डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे शनिवारी (ता. ०१) सुपूर्द करण्यात आला.

एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिक्षणतज्ञ डॉ. एस.एन. पठाण, डॉ.संजय उपाध्ये, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, विष्णू खांदवे आणि इक्बाल शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

माईर्स एमआयटी शिक्षण समूह, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, उज्जैनची एमआयटी अवंतिका युनिव्हर्सिटी आणि शिलॉग येथील एमआयटी यूटीएमच्या शैक्षणिक संस्थांचे एकुण ५४ हजार विद्यार्थी, २,५०० शिक्षक आणि ३,५०० शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हे योगदान देण्यात आले आहे.

भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणारे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे वैभवशाली सुवर्णजडित गाभारा मंदिर भविष्यात संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या सुसंस्कारासाठी उपयुक्त होणार असल्याचे उद्गार माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी याप्रसंगी बोलताना काढले.

या पवित्र स्थळाचे पावित्र्य व त्याचा अद्भूत इतिहास कर्तव्य भावनेतून जपून ठेवा.पवित्र धर्म तीर्थक्षेत्रांचा ज्ञानतीर्थ क्षेत्र म्हणून विकास करून भंडारा डोंगराचे वैभवशाली स्वरूप जगासमोर विशेषतः युवा पिढीपुढे आणण्याचे आवाहन देखील डॉ. कराड यांनी केले.

भंडारा डोंगरावर जवळपास दिडशे कोटी रूपये खर्च करुन सुरु असलेल्या मंदिर निर्मिती कार्यात एमआयटी संस्थेच्या निधीचा खूप मोठा वाटा आहे. भंंडारा डोंगरावरून संपूर्ण जगात शांतीचा मंत्र दिला जात असल्याचे सांगत,बाळासाहेब काशिद यांंनी आभारपुर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. पठाण यांचे मुस्लिम समाजास मदतीचे आवाहन

चारशे वर्षापूर्वी दुभंगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे महान कार्य जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी केले. तुकोबांनी लिहिलेल्या अभंगानंतर मुस्लिम समाजातील बरेच लोक वारीला जावू लागले. मंदिर निर्मितीसाठी अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंचच्या वतीने सव्वा लक्ष रूपये देणगी देत तुकोबांच्या मंदिरासाठी मुस्लिम समाजातील लोकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंचाचे संस्थापक एस. एन. पठाण पठाण यांनी याप्रसंगी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT