Covishied and Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात आज वीस हजार डोस

कोरोना प्रतिबंधक लशीचे वीस हजार सहाशे डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना प्रतिबंधक लशीचे वीस हजार सहाशे डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे १९ हजार व कोव्हॅक्सिन लशीचे एक हजार सहाशे डोसचा समावेश आहे. ते देण्याची व्यवस्था शुक्रवारी (ता. १) अनुक्रमे ४५ व आठ अशा ५३ केंद्रावर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

कोव्हॅक्सिन लस ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे. मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोनशे डोस उपलब्ध आहेत. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी व निळूभाऊ फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीचे प्रत्येकी एक हजार डोस उपलब्ध आहेत. अन्य सात केंद्रांवर प्रत्येकी पाचशे आणि ३५ केंद्रांवर प्रत्येकी चारशे डोस उपलब्ध आहेत.

कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

गर्भवतींसाठी स्वतंत्र व्यवस्था

स्तनदा माता व गर्भवतींसाठी नवीन भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड येथे व्यवस्था केली आहे.

७५ तास लसीकरण मोहीम

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग ७५ तास लसीकरण मोहीम नवी सांगवी येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात सुरू झाली. त्याचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, क्षेत्रिय अधिकारी विवेक थोरात, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, सीएसआर सेलचे विजय वावरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT