पिंपरी-चिंचवड

इथे आढळले एकाच कुटुंबातील 25 जण पाॅझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर. उद्योगनगरी अशी ओळख. पदपथावर राहणाऱ्यांपासून हाय क्लास सोसायटीत राहणारे उच्चभ्रू लोक इथे स्थायिक आहेत. स्थानिक तसेच नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेरून आलेलेही आहेत. कामगार आहेत, नोकरदार आहेत. रोजंदारी मजूर आहेत. उद्योजक आहेत. जसे सर्व समाज घटकातील लोक इथे सगळीकडे आढळतात, तसा जागतिक महामारी ठरलेला कोरोना संसर्ग सुद्धा सगळीकडे आता पसरला आहे. त्यामुळे शहराचे अनेक भाग चर्चेत आले आहेत. यात घरकुल आहे, रुपी नगर आहे. आनंदनगर आहे. तसे आता दापोडीतील सिद्धार्थनगर चर्चेत आले आहे. पण, त्याचं कारण जरा कौटुंबिक आहे. कारण, सिद्धार्थनगरमधील एकाच कुटुंबातील तब्बल पंचवीस जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 

सिद्धार्थनगर दापोडी. पुणे-मुंबई महामार्गालगतची झोपडपट्टी वसाहत. ऐतिहासिक हॅरिस पुलाला लागून असलेली. संरक्षण विभागाच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीएमईच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भाग. एकिकडे पुणे-मुंबई महामार्ग, दुसऱ्या बाजूला पुणे-मुंबई लोहमार्ग. उत्तरेला रेल्वेस्थानक मंडई परिसर आणि दक्षिणेस मुळा नदी यामुळे सिद्धार्थनगर विस्तारास मर्यादा आली आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती हीच येथील मुख्य समस्या आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दाट लोकवस्ती आणि शेजारी शेजारी घरे. घराचे क्षेत्रफळ कमी. एका घरात चार पेक्षा अधिक लोक यामुळे सोशल डिस्टंसिंगचा अभाव. यामुळे संसर्ग वाढण्यास वाव आहे. शिवाय, येथील गल्ल्या नव्हे बोळच अतिशय अरुंद आहेत. अवघे चार पाच फूट रुंदीचे बोळ आहेत. म्हणजेच घरातच नव्हे तर बोळातून चालताना सुद्धा सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नाही, अशी येथील स्थिती आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सिद्धार्थनगर मधील एक रुग्ण सुरवातीला आढळला. त्याच्या हायरिस्क काॅन्टॅक्टमधील ९० जणांची एकाच दिवशी तपासणी केली. त्यातील तब्बल पंचवीस जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले आहेत. अजून सर्वेलीयन सुरू असून लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांनी फ्लूची लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

Indian Women Cricket Team : भारतीय महिला टीमचे कोच अमोल मुजुमदार; महिला वर्ल्डकप विजयानंतर कुंभारघर गावात आनंदाचा वर्षाव

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी अभियंत्यांवर गुन्हा दाखल!

World Cup जिंकताच, भारतीय खेळाडूंना लागली आणखी एक लॉटरी; जेमीमा, स्मृतीला प्रचंड नफा

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

SCROLL FOR NEXT