पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढत असून, चोरटे इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी लक्ष्य करीत आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पंधरा दिवसांत तब्बल 33 दुचाकींची चोरी झाली असून, हे प्रमाण दिवसाला दोन इतके असल्याचे दिसून येते. बुधवारी एकाच दिवशी पिंपरी, भोसरी व एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
लॉकडाउनच्या कालावधीत खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हाणामारी आदी गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्याचप्रमाणे वाहन चोरीच्याही घटना घटल्या होत्या. मात्र, जून महिन्याच्या सुरूवातीपासून पुन्हा चोरट्यांनी वाहनांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक असून 22 जूनला तर एकाच दिवशी पाच दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद झाली. चोरटे हॅंडल लॉक तोडून राजरोसपणे पार्किंगमधून अथवा इतर ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी पळवून नेत आहेत. दरम्यान, दुचाकी चोरी उघड होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पंधरा दिवसांत तब्बल 33 दुचाकींची चोरी झाली असून हे चोरीचे प्रमाण दिवसाला दोन इतके असल्याचे दिसून येते. बहुतांश दुचाकींची पार्किंगमधून चोरी झाली आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बुधवारी (ता. 22) पिंपरी, भोसरी व एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तीन गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये पहिली घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडली. राहत्या घरासमोरून भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी लक्ष्मण नारायण डोंगरे (रा. असम सोसायटी, संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर दुसरी घटना पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील साईबाबा टीव्हीएस सर्व्हिस सेंटरजवळ घडली. यामध्ये भिमाशंकर महादेव इंगळे (रा. हनुमाननगर, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना रविवारी (ता.21) उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रुषीकेश हरि कळसाईत (वय 24, रा. राणतारा कॉलनी, सदगुरूनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तर तिसरी घटनेत भोसरीतील गवळीमाथा येथून संदीप अशोक धोत्रे (रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी) यांची दुचाकी चोरीला गेली. ही घटना शुक्रवारी (ता.19) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वाहनचोरीच्या घटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.