Money Sakal
पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यातील शाळांना फीमध्ये ३५ टक्के सवलत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळणार आहे.

प्रशांत पाटील

वडगाव मावळ - कोरोना संसर्गाच्या (Corna Infection) पार्श्वभूमीवर मावळातील विनाअनुदानित शाळांमधील (School) सर्व विद्यार्थ्यांना (Student) शैक्षणिक फीमध्ये (Fee) संस्थानकडून तीस टक्के व आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांच्याकडून पाच टक्के अशी एकूण ३५ टक्के सवलत (Cincession) मिळणार आहे. सोमवारी येथे झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (35 Percent Discount in Fees for Schools in Maval Tahsil)

खासगी शाळांच्या फीबाबत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, संस्थाचालक प्रतिनिधी चंद्रकांत शेटे, गणेश भेगडे, संतोष खांडगे, प्रकाश ओसवाल, गणेश खांडगे, संदीप काकडे, शैलेश शहा, किशोर राजेश तसेच पालकांनी चर्चेत सहभाग घेतला.

सर्व शैक्षणिक संस्था बंद असून, काही संस्थानी ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलेले आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावलेला असून फीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पालक व संस्थाचालक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षात फी मध्ये ५० टक्के सवलतीची जोरदार मागणी करण्यात आली होती. संस्था या निर्णयाला तयार नव्हत्या. अखेर माजी राज्यमंत्री भेगडे व आमदार शेळके यांनी संस्थाचालकांनी पालकांना तीस टक्के सवलत देण्याची विनंती केली.

काही झाले निर्णय

  • कोरोना काळात पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत

  • पालकांना फी भरण्यासाठी फीचे समान हप्ते करून द्यावेत

  • पालकांनी मागील वर्षीची थकीत फी भरावी

  • मनमानी फी आकरणाऱ्या काही इंग्रजी माध्यमावर अंकुश ठेवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT